ETV Bharat / state

शहरी उद्योगांसह शेतीव्यवसायालाही लॉकडाऊनचा फटका, शेतकामांसाठी मजुरांचा मोठा तुटवडा

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आला आहे. परंतु, या लॉकडाऊनचा फटका शहरी उद्योगांसह शेतीव्यवसायलाही बसत आहे. नेहमी निसर्गाच्या अनिश्चितीचा फटका सहन करणाऱ्या शेतकऱ्यांना आता कोरोना व्हायरसचा फटका बसत आहे.

Lockdown impact on agriculture sector in satara
शहरी उद्योगांसह शेतीव्यवसायलाही लॉकडाऊनचा फटका
author img

By

Published : Aug 8, 2020, 7:14 PM IST

Updated : Aug 8, 2020, 7:37 PM IST

सातारा - कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आला आहे. परंतु, या लॉकडाऊनचा फटका शहरी उद्योगांसह शेतीव्यवसायलाही बसत आहे. नेहमी निसर्गाच्या अनिश्चितीचा फटका सहन करणाऱ्या शेतकऱ्यांना आता कोरोना व्हायरसचा फटका बसत आहे. शेतात काम करण्यासाठी मजूर मिळत नाहीत तर दूध उत्पादन घेणाऱ्या शेतकरी वर्गाला मजूर जोडपी मिळत नसल्याने याचा फटका अर्थव्यवस्थेला बसत आहे.

दरम्यान, लॉकडाऊनमध्ये शेतीची कामे आणि त्याच्याशी संबंधित कामांना सूट देण्यात आली होती. परंतु, नाशवंत शेतमालाचे नुकसानच होत आहे. भाजीपाल्याची आवक बाजारात कमी झाली आहे. त्यामुळे किरकोळ विक्रेत्यांकडून ग्राहकांची लूट केली जात आहे. भाजीपाला उत्पादकांसह फुल शेती करणाऱ्यालाही मोठा आर्थिक फटका बसत आहे. तसेच शेतात काम करत असताना अनेक ठिकाणी स्थानिक मजूर जास्तीचे पैसे घेत आहेत तर ज्यांना परवडत नाही ते घरचे मनुष्यबळ वापरत आहेत.

शहरी उद्योगांसह शेतीव्यवसायालाही लॉकडाऊनचा फटका
अनेक दूध व्यवसायातील शेतकरी परप्रांतीय कुटुंब आपल्याकडे कामाला ठेवत होते. मात्र, ते लॉकडाऊनमध्ये गावी गेल्याने या ठिकाणी घरातील व्यक्ती हे काम करत आहेत. तेदेखील मनुष्यबळ कमी पडत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. यामुळे दुग्धव्यवसाय देखील चिंतेत सापडला आहे. माल शेतातून काढला तर तो बाजारपेठेत जात नाही आणि गेला तर भाव पाडून मागणी होते. काही ठिकाणी शेतमालाचे शेतातच नुकसान होत आहे.

एकंदरीत ज्या प्रकारे शहरातील मोठे उदयोग बंद पडले, तसेच ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेचा कणा असणारा शेती व्यवसायही मजूर नसल्याने अडचणीत आला आहे.

Last Updated : Aug 8, 2020, 7:37 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.