ETV Bharat / state

कराड : साजूर गावात बिबट्याचा शेतकर्‍यांवर हल्ला - Karad leopard news

कराड तालुक्यातील साजूर-गारवडे शिवारात मादी बिबट्याने दोन शेतकऱ्यांवर हल्ला केला. या हल्ल्यातून दोघेही बचावले आहेत. मात्र बिबट्यांच्या वावरामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. तसेच या ठिकाणी नर आणि मादी बिबट्यासह दोन बछडेही आहेत.

Karad
Karad
author img

By

Published : Apr 21, 2021, 3:20 PM IST

कराड ( सातारा) : कराड तालुक्यातील साजूर-गारवडे शिवारात मादी बिबट्याने दोन शेतकऱ्यांवर हल्ला केला. या हल्ल्यातून दोघेही बचावले आहेत. मात्र बिबट्यांच्या वावरामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. तसेच या ठिकाणी नर आणि मादी बिबट्यासह दोन बछडेही आहेत.

साजूर येथील एक शेतकरी दुपारी शेतात वैरण आणण्यासाठी गेला होता. शेतात गेल्यानंतर त्याच्यावर बिबट्याने हल्ला केला. पण शेतकऱ्यांने आपल्या हातातील खुरप्याने मादी बिबट्याला हुसकावले आणि आरडाओरडा केली. त्यामुळे शेजारच्या शेतातील लोक धावून आले. त्यांना तेथे बिबट्यांचे नवजात बछडे दिसले. बिबट्याने एक दिवसांपूर्वीच बछड्यांना जन्म दिला आहे. बछडे असलेल्या आजुबाजूला शेतकरी गेल्यामुळे मादी बिबट्याने शेतकऱ्यांवर केला. या हल्ल्यात शेतकऱ्यांना कसलीही इजा झालेली नाही.

बछड्यांमुळे बिबट्या हल्ला करत असल्याने साजूर गावातील शेतकरी रानात जायला भीत आहेत. साजूर आणि गारवडे या दोन गावांच्या हद्दीवर नर आणि मादी बिबट्यांचे दर्शन होत आहे. या घटनेची माहिती वन विभागाला देण्यात आली आहे. बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.