ETV Bharat / state

कृष्णा अभिमत विद्यापीठ देशातील नामांकित शंभर विद्यापीठांच्या यादीत; महाराष्ट्रात तृतीय स्थानावर - krishna hospital karad

कृष्णा विद्यापीठातील अध्यापन पद्धती व संसाधने, संशोधन कार्य व व्यावसायिक प्रॅक्टिस, सर्वसमावेशकता व सामाजिक उत्तरदायित्व इत्यादी निकषांच्या आधारे देशातील सर्वोत्कृष्ट 100 विद्यापीठांमध्ये कृष्णा अभिमत विद्यापीठाचा समावेश झाला आहे.

कृष्णा अभिमत विद्यापीठ
कृष्णा अभिमत विद्यापीठ
author img

By

Published : Jun 12, 2020, 8:25 PM IST

कराड (सातारा) - भारत सरकारच्या केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने जाहीर केलेल्या देशातील सर्वोत्कृष्ट 100 विद्यापीठांच्या यादीत कराड येथील कृष्णा वैद्यकीय विज्ञान अभिमत विद्यापीठाने स्थान पटकाविले आहे. तसेच वैद्यकीय शिक्षण संस्था या गटामध्ये हे विद्यापीठ महाराष्ट्रात तृतीय स्थानावर आहे.

केंद्रीय मन्युष्यबळ विकास मंत्रालयामार्फत दरवर्षी देशातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठांची नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क (एन.आय.आर.एफ.) यादी तयार केली जाते. त्यानुसार सन 2020 सालातील देशातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठांची व शैक्षणिक संस्थांची यादी केंद्रीय मन्युष्यबळ विकासमंत्री डॉ. रमेश पोखरियाल यांनी नुकतीच नवी दिल्ली येथे जाहीर केली. देशात सुमारे 800 हून अधिक विद्यापीठे आहेत. यामध्ये विद्यापीठातील अध्यापन पद्धती व संसाधने, संशोधन कार्य व व्यावसायिक प्रॅक्टिस, सर्वसमावेशकता व सामाजिक उत्तरदायित्व इत्यादी निकषांच्या आधारे देशातील सर्वोत्कृष्ट 100 विद्यापीठांमध्ये कृष्णा अभिमत विद्यापीठाचा समावेश झाला आहे. हे देशात 90 व्या स्थानी आहे. तसेच वैद्यकीय शिक्षण या विभागात देशातील सर्वोत्कृष्ट 50 वैद्यकीय शिक्षण संस्थांच्या यादीत कृष्णा मेडिकल कॉलेज देशात 37 व्या आणि महाराष्ट्रात तिसऱ्या स्थानावर आहे.

सहकारमहर्षी दिवंगत जयवंतराव भोसले यांच्या दूरदृष्टीतून साकारलेल्या कृष्णा वैद्यकीय शिक्षण संस्थेला 2005 साली अभिमत विद्यापीठ म्हणून मान्यता लाभली. विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली या विद्यापीठाने वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात यशस्वी घोडदौड सुरू केली आहे. कृष्णा अभिमत विद्यापीठाला यापूर्वीच ‘आयएसओ 9001 : 2008’ मानांकन प्राप्त झाले आहे. या विद्यापीठाशी संलग्न असलेल्या 1100 बेडच्या सुसज्ज कृष्णा हॉस्पिटलचे आरोग्य क्षेत्रात मोठे कार्य असून, सध्याच्या कोरोना साथीच्या काळात या हॉस्पिटलमध्ये आत्तापर्यंत 177 कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच कृष्णा हॉस्पिटलमध्ये कोविड-१९ च्या चाचण्यादेखील केल्या जात आहेत. याचबरोबर कोरोना लस संशोधन प्रकल्पात सहभागी झालेल्या देशभरातील निवडक 40 संस्थांमध्ये कृष्णा हॉस्पिटलचा समावेश आहे.

सर्वोत्कृष्ट 10 विद्यापीठांमध्ये येण्याचा संकल्प : डॉ. सुरेश भोसले

राष्ट्रीय स्तरावरील सर्वोत्कृष्ट 100 विद्यापीठांमध्ये कृष्णा अभिमत विद्यापीठाचा समावेश होणे, ही आम्हा सर्वांसाठी आनंददायी गोष्ट आहे. ग्रामीण भागात आरोग्य शिक्षण उपलब्ध व्हावे, या उद्देशाने स्थापन झालेली ही संस्था अवघ्या 15 वर्षात देशातच नाही तर जगभरातही नावारूपाला येत आहे. देशातील सर्वोत्कृष्ट 10 विद्यापीठांमध्ये येण्याचा आमचा संकल्प आहे, अशी प्रतिक्रिया कृष्णा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले यांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.