ETV Bharat / state

Koyna Dam Earthquake : कोयना धरण परिसर भूकंपाच्या सौम्य धक्क्यानं हादरला; धरण पूर्णपणे सुरक्षित

Koyna Dam Earthquake : साताऱ्यातील कोयना धरण परिसरात १२ दिवसात दुसऱ्यांदा भूकंप झाला आहे. शनिवारी रात्री ९ वाजून ५ मिनिटांनी २.९ रिश्टर स्केलच्या भूकंपाने कोयना धरणाचा परिसर हादरला. भूकंपाने धरणाला कोणताही धोका पोहोचला नसल्याची माहिती धरण व्यवस्थापनाने दिली आहे.

Koyna Dam Earthquake
Koyna Dam Earthquake
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 28, 2023, 10:51 PM IST

सातारा Koyna Dam Earthquake : कोयना धरण परिसरात शनिवारी रात्री 9 वाजून 5 मिनिटांनी भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. या भूकंपाची तीव्रता 2.9 रिश्टर स्केल इतकी नोंदली गेली आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू कोयनानगरपासून 10 किलोमीटर अंतरावरील गोषटवाडी गावाच्या पश्चिमेस 7 किलोमीटरवर होता.

कोयना धरण सुरक्षित : भूकंपाच्या या धक्क्यामुळं कोयना धरणाला कोणताही धोका पोहोचलेला नाही. तसंच कोठंही पडझड झाली नसल्याची माहिती कोयना धरण व्यवस्थापन, महसूल प्रशासनाने दिली आहे. भूकंपाचा धक्का सौम्य असल्यानं तो कोयनानगर परिसरातच जाणवला. पाटण तालुक्यात अन्यत्र कोठंही या भूकंपानं पडझड झालेली नाही.

12 दिवसात भूकंपाचा दुसरा धक्का : कोयना धरण परिसरात दि. 16 ऑक्टोबर रोजी रात्री 11:30 च्या सुमारास 3.2 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला होता. भूकंपाचा केंद्रबिंदू कोयना धरणापासून 24 किलोमीटर अंतरावर वारणा खोऱ्यातील चांदोली (जि. सांगली) गावाच्या पुर्वेस 7 किलोमीटर अंतरावर होता. भूकंपाची खोली जमिनीत 17 किलोमीटर होती.

यंदाच्या वर्षातील भूकंपाचा सातवा धक्का : पाटण तालुक्यातील कोयनानगर परिसरात झालेल्या भूकंपानं तालुक्यात कोठंही पडझड अथवा हानी झालेली नाही, अशी माहिती कोयना धरण व्यवस्थापनाच्या सुत्रांनी दिली आहे. 8 जानेवारी 2023 रोजी 209 रिश्टर स्केल तीव्रतेचा वर्षातील पहिला भूकंप झाला होता. त्यानंतर 1 फेब्रुवारी, दि. 6 मे, दि. 16 ऑगस्ट, दि. 7 सप्टेंबर, दि. 29 ऑक्टोबर रोजी भूकंपाचे धक्के जाणवले होते.

2021 मध्ये जाणवले भूकंपाचे 128 धक्के : कोयना धरण परिसरात 2021 सालात सौम्य आणि अति सौम्य भूकंपाची मालिका सुरू होती. भूकंप मापन केंद्रावर मागील वर्षभरात तब्बल 128 भूकंपाच्या धक्क्यांची नोंद झाली. त्यामध्ये 3 रिश्टर स्केलच्या 119 आणि 3 ते 4 रिश्टर स्केलच्या 9 धक्क्यांचा समावेश होता. भूकंपांच्या मालिकेमुळे नागरिक भयभीत झाले होते.

हेही वाचा -

Koyna Dam Earthquake: कोयना धरणाचा परिसर भूकंपाच्या सौम्य धक्क्यानं हादरला, कोणतीही हानी नाही

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.