ETV Bharat / state

'ट्रॅडिशनल डे' आला अंगलट; प्रीतिसंगमावर प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढणारे पोलिसांच्या ताब्यात - प्रीतिसंगम यशवंतराव चव्हाण

कराडच्या प्रीतिसंगमावर यशवंतराव चव्हाण यांचे समाधीस्थळ आहे. या परिसराचे पावित्र्य जपण्याचा सर्वजण कसोशीने प्रयत्न करतात. कराड नगरपालिकेचे चौकीदार येथे चोवीस तास तैनात असताना युवकांनी धुडघुस घातला आहे.

karad-police-arrested-seven-boys
प्रीतिसंगमावर प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढणारे पोलिसांच्या ताब्यात
author img

By

Published : Jan 16, 2020, 1:10 PM IST

सातारा - मकर संक्रातीनिमित्त 'ट्रॅडिशनल डे' साजरा करणार्‍या महाविद्यालयीन युवकांनी बुधवारी सायंकाळी कराडच्या प्रीतिसंगमावरील यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी परिसरात प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढत धुडगुस घातला. त्यानंतर पोलिसांनी युवकांची धरपकड करत रात्री उशीरापर्यंत सात जणांना ताब्यात घेतले आहे.

प्रीतिसंगमावर प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढणारे पोलिसांच्या ताब्यात

हेही वाचा - ठाकरे सरकारचा फडणवीसांना पुन्हा दणका, 'या' नियुक्त्या केल्या रद्द

कराडच्या प्रीतिसंगमावर यशवंतराव चव्हाण यांचे समाधीस्थळ आहे. या परिसराचे पावित्र्य जपण्याचा सर्वजण कसोशीने प्रयत्न करतात. कराड नगरपालिकेचे चौकीदार येथे चोवीस तास तैनात असतात. असे असताता मकर संक्रातीदिवशी 'ट्रॅडिशनल डे' (पारंपरिक दिवस) साजरा करणार्‍या युवकांनी बुधवारी सकाळी एका महाविद्यालयामध्ये प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी सर्व युवकांना त्या परिसरातून बाहेर हाकलून लावले होते. त्यानंतर सायंकाळी पुन्हा प्रीतिसंगम परिसरातील यशवंतराव चव्हाण समाधी परिसरात येऊन युवकांनी धुडगुस घातला. तोंडाला रूमाल बांधून प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढत मोठा गोंधळ केला. तसेच प्रतिकात्मक अंत्ययात्रेचे मोबाईलवर चित्रिकरण करून ते सोशल मीडियावर व्हायरल केले.

युवकांनी घातलेला धुडगुस पाहून प्रीतिसंगम बागेत फिरण्यासाठी आलेल्या यशवंतप्रेमींचा संताप अनावर झाला. त्यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात संपर्क साधून घटनेची माहिती दिली. त्यानंतर तातडीने पोलीस उपअधीक्षक सुरज गुरव यांनी हे पोलीस फौजफाट्यासह प्रीतिसंगमावर आले. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओवरून आणि घटनास्थळी मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी रात्री उशीरापर्यंत युवकांची धरपकड केली. पोलिसांनी रात्री उशीरापर्यंत सात जणांना ताब्यात घेतले होते. प्रीतिसंगमावर धिंगाणा घालणार्‍यांवर कडक कारवाई करणार असल्याचा इशारा डीवायएसपी सुरज गुरव यांनी दिला आहे.

हेही वाचा - यवतमाळच्या दिग्रसमध्ये शीर नसलेला अज्ञात महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ

Intro:मकर संक्रातीनिमित्त ट्रॅडिशनल डे साजरा करणार्‍या महाविद्यालयीन युवकांनी बुधवारी सायंकाळी कराडच्या प्रीतिसंगमावरील स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी परिसरात प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढत धुडगुस घातला. यामुळे संतप्त झालेल्या यशवंतप्रेमींनी पोलिसांना युवकांच्या हुल्लडबाजीची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी युवकांची धरपकड करत रात्री उशीरापर्यंत सात जणांना ताब्यात घेतले.Body:
कराड (सातारा) - मकर संक्रातीनिमित्त ट्रॅडिशनल डे साजरा करणार्‍या महाविद्यालयीन युवकांनी बुधवारी सायंकाळी कराडच्या प्रीतिसंगमावरील स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी परिसरात प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढत धुडगुस घातला. यामुळे संतप्त झालेल्या यशवंतप्रेमींनी पोलिसांना युवकांच्या हुल्लडबाजीची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी युवकांची धरपकड करत रात्री उशीरापर्यंत सात जणांना ताब्यात घेतले.
  कराडच्या प्रीतिसंगमावरील स्व. यशवंतराव चव्हाण यांचे समाधीस्थळा हे यशवंतप्रेमींचे शक्तीस्थळ मानले जाते. या परिसराचे पावित्र्य जपण्याचा सर्वजण कसोशीने प्रयत्न करतात. कराड नगरपालिकेचे चौकीदार समाधी परिसरात चोवीस तास पहारा देण्यासाठी तैनात असतात. असे असताता मकर संक्रातीदिवशी ट्रॅडिशनल डे साजरा करणार्‍या युवकांनी बुधवारी सकाळी एका कॉलेजमध्ये प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी सर्व युवकांना त्या कॉलेजच्या परिसरातून बाहेर हाकलून लावले होते. त्यानंतर सायंकाळी पुन्हा प्रीतिसंगम परिसरातील स्व. यशवंतराव चव्हाण समाधी परिसरात येऊन युवकांनी धुडगुस घातला. तोंडाला रूमाल बांधून प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढत मोठा गोंधळ केला. तसेच प्रतिकात्मक अंत्ययात्रेचे मोबाईलवर चित्रिकरण करून ते सोशल मीडियावर व्हायरल केले. 
   युवकांनी घातलेला धुडगुस पाहून प्रीतिसंगम बागेत फिरण्यासाठी आलेल्या यशवंतप्रेमींचा संताप अनावर झाला. त्यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात संपर्क साधून घटनेची माहिती दिली. त्यानंतर तातडीने डीवायएसपी सूरज गुरव यांनी हे पोलीस फौजफाट्यासह प्रीतिसंगमावर आले. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओवरून आणि घटनास्थळी मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी रात्री उशीरापर्यंत युवकांची धरपकड केली. पोलिसांनी रात्री उशीरापर्यंत सात जणांना ताब्यात घेतले होते. प्रीतिसंगमावर धिंगाणा घालणार्‍यांवर कडक कारवाई करणार असल्याचा इशारा डीवायएसपी सूरज गुरव यांनी दिला आहे.Conclusion:null
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.