ETV Bharat / state

कराड जनता बँकेच्या ठेवीदारांचे क्लेमसह केवायसी फॉर्म भरून घेण्यास सुरुवात

author img

By

Published : Dec 16, 2020, 2:55 AM IST

दिवाळखोरीत निघालेल्या कराड जनता सहकारी बँकेच्या ठेवीदारांना एकूण 5 लाखापर्यंतची रक्कम परत मिळणार आहे. त्यासाठी क्लेम फॉर्म भरून देणे आवश्यक आहे.

Karad Janata Bank depositors filling KYC for claim
कराड जनता बँकेच्या ठेवीदारांचे क्लेमसह केवायसी फॉर्म भरून घेण्यास सुरुवात

कराड (सातारा) - दिवाळखोरीत निघालेल्या कराड जनता सहकारी बँकेच्या ठेवीदारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. काल (मंगळवार ता.15) पासून बँकेच्या 29 शाखांमध्ये ठेवीदारांचे क्लेम फॉर्म आणि केवायसी फॉर्म भरून घेण्यास सुरूवात झाली आहे. ही प्रक्रिया आणि ऑडीट पूर्ण झाल्यानंतर तीन ते चार महिन्यात पाच लाखापर्यंतच्या ठेवीदारांना फॉर्ममध्ये नमूद केलेल्या सहकारी अथवा राष्ट्रीयीकृत बँकांच्या खात्यावर त्यांचे पैसे जमा होतील. या प्रक्रियेला सुरूवात झाल्यामुळे ठेवीदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

कराड जनता सहकारी बँकेच्या सर्व ठेवीदारांना 5 लाख रूपयांचे विमा संरक्षण आहे. रिझर्व्ह बँकेने कराड जनता बँकेचा परवाना रद्द केला. तथापि, विमा सरंक्षणामुळे 99 टक्के ठेवीदारांचे 5 लाखापर्यंतचे पैसे त्यांना परत मिळणार आहेत. मागील आठवड्यात ठेव विमा व पत हमी कार्पोरेशनच्या अधिकार्‍यांची पुणे येथे बैठक झाली. त्या बैठकीत ठेवीदारांचे क्लेम फॉर्म आणि केवायसी घेण्याचा निर्णय झाला. त्या निर्णयानुसार कार्यवाहीला कालपासून (मंगळवार) सुरूवात झाली आहे.

5 लाखापर्यंतची रक्कम मिळणार परत

बँकेच्या सर्व ठेवीदारांना एकूण 5 लाखापर्यंतची रक्कम परत मिळणार आहे. त्यासाठी क्लेम फॉर्म भरून देणे आवश्यक असल्याचे अवसायक तथा कराड तालुका सहकारी संस्था उपनिबंधक मनोहर माळी यांनी सांगितले आहे. केवायसी कागदपत्रे जोडून ठेवीदारांनी आपल्या नजीकच्या शाखेत जमा करावी. लवकरात लवकर ही प्रक्रिया पुर्ण करण्यासाठी ठेवीदारांनी सहकार्य करण्याचे आवाहन देखील माळी यांनी केले आहे. दरम्यान, बँकेचे 31 मार्च अखेरचे ऑडीट पुर्णत्वाकडे आले आहे. आता 7 डिसेंबर अखेरपर्यंतचेही ऑडीट केले जाणार असल्याचे माळी म्हणाले.

हेही वाचा - अनैतिक संबंध उघड करण्याची धमकी देऊन 50 हजारांची खंडणी उकळणारा गजाआड

हेही वाचा - शाहूनगरीच्या त्रिशताब्दी महोत्सवाचा सातारकरांना पडलाय का विसर?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.