कराड (सातारा) - शेती पंपाला नवीन वीज कनेक्शन देण्यासाठी 5 हजारांची लाच स्वीकारताना एमएसईबीच्या वाठार (ता. कराड) येथील कनिष्ठ अभियंत्यास सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. राहूल अशोक सोनवले (रा. गजानन हौसिंग सोसायटी, कराड) असे अभियंत्याचे नाव आहे.
हेही वाचा - साताऱ्यातील तारळेमध्ये जिलेटिनचा साठा जप्त
शेती पंपाला वीज कनेक्शन देण्यासाठी कनिष्ठ अभियंता राहूल सोनवले याने तक्रारदार शेतकर्याकडे 5 हजार रुपये लाचेची मागणी केली होती. यासंदर्भात शेतकर्याने सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. तक्रारीच्या अनुषंगाने पडताळणी करण्यात आली असता लाचेची मागणी करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. बुधवारी (दि. 12) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावून तक्रारदाराकडून 5 हजारांची लाच स्वीकारताना राहूल सोनवले यास रंगेहात पकडले. स्वीकारलेल्या लाचेची रक्कम जप्त करून सोनवले यास अटक करण्यात आली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक अशोक शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अविनाश जगताप, पोलीस नाईक ताटे, कॉन्स्टेबल येवले यांच्या पथकाने ही कारवाई केली.
हेही वाचा - धाकट्या भावाची कुऱ्हाडीचे घाव घालून हत्या; तीन तासात अल्पवयीन मुलगा ताब्यात