ETV Bharat / state

जिवाजी महालेंच्या वारसदारांना सोडावे लागले शिक्षण; हालाखीच्या परिस्थितीत जगताहेत आयुष्य! - jiva mahale anscestors

प्रतापगडाच्या पायथ्याला छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफजल खानाच‍‍ा वध करून भीम पराक्रम केला. खानाच्या वधावेळी महाराजांवर चाल करून आलेल्या सय्यद बंडाचा हात महाले यांनी दांडपट्ट्याने हवेत उडवला. यानंतर १७०७ मध्ये साताऱ्याचे शंभू छत्रपती यांनी महाले यांच्या वारसदारांना दोन गावे इनामी दिली. परंतु, आत्ता जिवा महाले यांचे चौदावे वंशज अत्यंत हालाखीच्या परिस्थितीचा सामना करत आहेत. पाहा हा खास रिपोर्ट...

jiva mahale anscestors
आत्ता जिवा महाले यांचे चौदावे वंशज अत्यंत हालाखीच्या परिस्थितीचा सामना करत आहेत.
author img

By

Published : Feb 19, 2020, 8:03 AM IST

सातारा - छत्रपती शिवाजी महाराजांवर अफजल खानाने वार केला. यानंतर खानाच्या पोटात वाघनखे घुसवून महारांनी त्याचा कोथळा बाहेर काढला. खान ओरडला...आणि त्याचा अंगरक्षक सय्यद बंडा महाराजांवर धावून आला. इतक्यात झडप घालून जिवा महाले याने सय्यद बंडाचा हात कलम केल‍ा अन् शिवाजी महाराजांच्या जीवावरील संकट टळले. या घटनेचा साक्षीदार मराठ्यांचा इतिहास आहे. परंतु, या वीर जिवाजी महाले-सपकाळ य‍ांचे १४ वे वंशज प्रकाश सपकाळ व कुटुंबीय हलाखीच्या परिस्थतीशी झगडत आहेत. लाखभर रुपयांसाठी सपकाळ यांच्या मुलीला शिक्षण थांबवावे लागले आहे.

आत्ता जिवा महाले यांचे चौदावे वंशज अत्यंत हालाखीच्या परिस्थितीचा सामना करत आहेत.

प्रतापगडाच्या पायथ्याला छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफजल खानाच‍‍ा वध करून भीम पराक्रम केला. शिवराय‍‍ांच्या जोडील‍ा असलेल्या मोजक्या सहकाऱ्यांपैकी एक अंगरक्षक होता जिवा महाले. खानाच्या वधावेळी महाराजांवर चाल करून आलेल्या सय्यद बंडाचा हात महाले यांनी दांडपट्ट्याने हवेत उडवला. यानंतर १७०७ मध्ये साताऱ्याचे शंभू छत्रपती यांनी महाले यांच्या वारसदारांना दोन गावे इनामी दिली. परंतु, आत्ता जिवा महाले यांचे चौदावे वंशज अत्यंत हालाखीच्या परिस्थितीचा सामना करत आहेत.

वाईपासून जवळपास ३५ किलोमीटर अंतरावर कमळ गडाच्या पायथ्याला कोंढवली गाव आहे. महाले यांचे वंशज प्रकाश सपकाळ हे पत्नी जयश्री, मुलगी प्रतीक्षा व मुलगा प्रतीक यांसह राहतात. एका छोट्याशा सलूनमध्ये प्रकाश नोकरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. चार वर्षांपूर्वी अर्धांगवायूच्या झटक्यामुळे प्रकाश यांचा रोजगार थांबला. कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी पत्नी जयश्री १०० रुपये रोजावर शेतात भांगलायला जातात. मुलगा प्रतीक इयत्ता नववीत शिकत आहे. तर, मुलीने खंडाळ्याच्या राजेंद्र महाविद्यालयातून शास्त्र शाखेतून प्रतीक्षाने बारावीची परीक्षा दिली. यानंतर ६० टक्के गुण मिळवून ती उत्तीर्णही झाली. मात्र, पुढील शिक्षणासाठी पुरेसे पैसे नसल्याने तिला नर्सिंगच्या कोर्सला प्रवेश घेता आला नाही. सध्या ती घरीच असते.

सांगलीत नर्सिंगच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी तसेच वसतीगृह व इतर खर्च साधारण एक लाख रुपयांपर्यंत जात असल्याचे सकपाळ यांच्या मुलीने सांगितले. हालाखीच्या परिस्थितीमुळे संबंधित रक्कम उभे करणे शक्य नसल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. तसेच धाकट्या भावाचे शिक्षण बाकी असल्याने मला शिक्षण थांबवायला लागल्याचे सकपाळ यांच्या मुलीने सांगितले.

जिवाजी महाले यांच्या कामगिरीची इतिहासाने 'होता जीवा, म्हणून वाचला शिवा' अशी नोंद घेतली. याच जिवाजींचे वंशज आज मोठ्या अडचणीचा सामना करत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.