ETV Bharat / state

'जरंडेश्वर'ला केलेला कर्ज पुरवठा नियमानुसारच, सातारा जिल्हा बँकेचे स्पष्टीकरण - ED news

'कोरेगावच्या जरंडेश्वर शुगर मिल्सला बँकेने मंजूर केलेल्या 237.60 कोटी पैकी 129.98 कोटी रुपये कर्ज वाटप केले असून 31 कोटी 60 लाख रुपयांची परतफेड झाली आहे. आजपर्यंत 97 कोटी 38 लाख रुपये नियमित येणेबाकी आहे, असे स्पष्टीकरण जिल्हा सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र सरकाळे यांनी दिले आहे.

जिल्हा मध्यवर्ती बँक
जिल्हा मध्यवर्ती बँक
author img

By

Published : Jul 10, 2021, 10:36 PM IST

Updated : Jul 10, 2021, 10:48 PM IST

सातारा - 'कोरेगावच्या जरंडेश्वर शुगर मिल्सला बँकेने मंजूर केलेल्या 237.60 कोटी पैकी 129.98 कोटी रुपये कर्ज वाटप केले असून 31 कोटी 60 लाख रुपयांची परतफेड झाली आहे. आजपर्यंत 97 कोटी 38 लाख रुपये नियमित येणेबाकी आहे. हे कर्ज कारखान्यास आधुनिकीकरण, विस्तारवाढ, को-जन, डिस्टीलरी व साखर मालतारण या कारणांसाठी बँकेने प्रचलित कायदे व बँकेच्या धोरणास अनुसरुन 2016-17 पासून मंजूर केले. ही मंजुरीसहभाग योजनेअंतर्गत लिड बँक (शिखर बँक) म्हणून पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत दिली आहे, अशी स्पष्टीकरण सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र सरकाळे यांनी दिले आहे.

बोलताना सातारा जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी

कोरेगावच्या जरंडेश्वर शुगर मिल्सला केलेला कर्जपुरवठा नियमानुसारच असल्याचे स्पष्टीकरण सायंकाळी सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र सरकाळे यांनी प्रसारमाध्यमांना दिले. बँकेला ईडीने (सक्त वसुली संचालनालय) नोटीस काढल्याच्या पार्श्वभूमीवर बँकेने हा खुलासा केला आहे.

कारखान्य‍ाची परतफेड नियमित

एकूण 237 कोटी 60 लाख रुपयांचे कर्ज मंजूर झाले. कारखान्याची कार्यक्षमता, परतफेड क्षमता, गाळप, मुल्यांकन, प्रकल्प खर्च, विस्तारीकरणामुळे वाढणारी आर्थिक सक्षमता, सक्षम तारण व बँकेच्या धोरणास अनुसरुन बँकेच्या संचालक मंडळाने कारखान्यास हे कर्ज दिले. कारखान्याने बँकेच्या कर्जावरील दरमहाचे व्याज व वसूलीस पात्र सर्व हप्त्याची लिड बँकेमार्फत नियमित परतफेड केली आहे. बँकेने केलेले कर्ज वाटप हे धोरणानुसारच केले. राज्य सहकारी बँकेमार्फत कारखान्याच्या जप्ती व लिलाव प्रक्रियेविरुध्दची बाब न्याय प्रविष्ठ झाल्याने राज्य बँकेची चौकशी करताना कारखान्यास कर्ज रुपाने मंजूर झालेल्या व वितरीत झालेल्या रक्कमांची माहिती मिळण्याबाबत सक्त वसूली संचालनालयाने बँकेस सुचित केले असल्याचेही राजेंद्र सरकाळे यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा - माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचे कुंभारगाव बनले कोरोनाचा हॉटस्पॉट

Last Updated : Jul 10, 2021, 10:48 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.