सातारा - जिल्ह्यातील आठ पोलीस निरीक्षक, १७ सहायक पोलीस निरीक्षक व २२ उपनिरीक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांचे आदेश पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी दिले आहेत.
अधिकाऱ्यांची बदललेली ठिकाणे
स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या निरीक्षकपदी किशोर धुमाळ, नवनाथ घोगरे (सायबर पोलीस ठाणे), सुरेश बोडखे (वडूज), प्रभाकर मोरे (कोरेगाव), नवनाथ मदने (पोलीस कल्याण), भरत किंद्रे (फलटण शहर), महेश इंगळे (खंडाळा), बाळू भरणे (कराड तालुका), संजय पतंगे (शाहूपुरी), आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक प्रताप भोसले यांची जिल्हाविशेष शाखेत बदली झाली आहे. उत्तम ज्ञानू भजनावळे यांची ढेबेवाडीतून आर्थिक गुन्हे शाखा, विजय घेरडे (सातारा शहर), संतोष साळुंखे (दहशतवाद विरोधी पथक), बाजीराव ढेकळे (म्हसवड), संतोष पवार (ढेबेवाडी), सतीश शिंदे (कोरेगाव), गणेश वाघमोडे (जिल्हा विशेष शाखा), सरोजिनी पाटील (कऱ्हाड शहर वाहतूक शाखा), रवींद्र तेलतुंबडे (वाई ), नवनाथ गायकवाड (फलटण शहर), रमेश गर्जे (स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा), चेतन मछले (शहर पोलीस ठाणे), अमोल माने (मेढा), सागर वाघ (बोरगाव), आशिष कांबळे (भुईंज) अभिजित चौधरी (सातारा तालुका) उपनिरीक्षक अंतम खाडे (जिल्हा वाहतूक शाखा), सुनील पवार (शिरवळ), विजय चव्हाण (नियंत्रण कक्ष), सदाशिव स्वामी (कऱ्हाड शहर), शशिकांत क्षीरसागर (खंडाळा), भीमराव यादव (प्रॉसिक्यूशन स्कॉड), देवनंद तुपे (दहिवडी), राजेंद्र काळे (कऱ्हाड शहर), शिवाजी घोरपडे (प्रॉसिक्यूशन स्कॉड), भरत नाळे (कोरेगाव उपअधिक्षक कार्यालय), दत्तात्रय बुलंगे (सातारा शहर), अर्जुन चोरगे (कराड शहर), यशवंत सुरेश महामुलकर (पाचगणी), प्रमोद सावंत (रहिमतपूर), किठ्ठल कृष्णा घाडगे (जिल्हा विशेष शाखा), मोहन फरांदे (सातारा तालुका), निवा मोरे (भुईंज), अन्वर मुजावर (सातारा शहर), प्रकाश उमाप (आर्थिक गुन्हे शाखा), सुहास रोकडे (सातारा शहर) आदींची बदली झाली आहे.
देण्यात आल्या होत्या तात्पुरत्या नियुक्त्या
गेल्या महिन्यात अनेक पोलीस निरीक्षक, सहायक निरीक्षक व उपनिरीक्षक बदली होऊन साताऱ्यात दाखल तर अनेकांच्या जिल्ह्याबाहेर बदल्या झाल्या. त्यांच्या पोलीस ठाण्यात नियुक्त्या होण्यापूर्वीच पदवीधर व शिक्षक विधानपरिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली. यामुळे सर्वांना मुख्यालयात नियंत्रण कक्षातून तात्पुरत्या नियुक्त्या देण्यात आल्या होत्या.