सातारा - जिल्ह्यात गेल्या आठ दिवसात बाधितांचा आकडा दुपटीने वाढला आहे. काल (रविवार) रात्री 12 वाजेपर्यंत जाहीर करण्यात आलेल्या अहवालानुसार 758 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहे. तर 6 बाधितांचा मृत्यू झाला आहे. यामुळे जिल्ह्यात वाढती कोरोना रुग्णसंख्या चिंता वाढवणारी ठरत आहे.
सातारा झाले हाॅटस्पाॅट
या बाबतची ताजी आकडेवारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे. गेल्या आठवड्यात जिल्ह्यात ३०० ते ४०० च्या दरम्यान रोजची बाधितांची संख्या होती. काल (रविवार) ती तब्बल 758 पर्यंत जाऊन पोहचली आहे. सातारा शहरासह तालुक्यातील बाधितांची संख्या सर्वाधिक असल्याने सातारा शहर हे कोरोनाचे हाॅटस्पाॅट झाले आहे.
6 बाधितांचा मृत्यू
स्व. क्रातीसिंह नाना पाटील रुग्णालयामध्ये 85 वर्षीय पुरुष, 51 वर्षीय महिला, फलटण येथील 60 वर्षीय महिला, रहिमतपुर (ता. कोरेगांव) येथील 77 वर्षीय पुरुष व जिल्ह्यातील विविध कोविड हॉस्पिटल मध्ये दुदुस्करवाडी (ता. जावली) येथील 58 वर्षीय पुरुष, अपशिंगे (ता. सातारा) येथील 58 वर्षीय पुरुष या 6 कोरोना बाधितांचा उपराचारा दरम्यान मृत्यू झाला असल्याचेही डॉ. चव्हाण यांनी सांगितले आहे.
हेही वाचा-निःशब्द भावनांना मिळाली सार्थ साद; बच्चू कडूंनी चिमुकल्यासाठी पाठवली सायकल
हेही वाचा-नांदेडमध्ये कोरोना लसीबाबत गैरसमजुतीचा मुलामा, आतापर्यंत केवळ १ लाख २९ हजार नागरिकांनीच घेतली लस