ETV Bharat / state

धक्कादायक; रोगप्रतिकारक शक्ती वाढविणाऱ्या गोळ्यांचा काळा बाजार, नागरिकांच्या आरोग्याशी खेळ

रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी उपयुक्त असलेल्या गोळ्यांची मागणी वाढल्याने अनेक ठिकाणी अवाच्या सव्वा दराने ह्या गोळ्या विकल्या जात आहेत. अर्सेनिक अल्बम 30 या होमिओपॅथिक गोळ्या रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी उपयुक्त आहेत. त्यामुळे त्यांची मागणी वाढली आहे. मात्र या गोळ्याचा सध्या तरी तुटवडा जाणवत आहे.

market
गोळ्या
author img

By

Published : May 29, 2020, 2:40 PM IST

सातारा - काही दिवसांपूर्वी मास्क, सॅनिटायझर यांचा तुटवडा निर्माण झाला होता. त्यानंतर मोठया प्रमाणात मास्क व सॅनिटायझरच्या किमतीत वाढ करून अनेक औषध विक्रत्यांनी काळा धंदा सुरू केला होता. त्यातच पुन्हा आता रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी उपयुक्त असलेल्या गोळ्यांची मागणी वाढल्याने अनेक ठिकाणी अवाच्या सव्वा दराने ह्या गोळ्या विकल्या जात आहेत. यामध्ये देखील बोगस कंपन्या आपले हात पाय पसरू लागले आहेत. तर त्यात औषध विक्रत्यांनी देखील होलसेल गोळ्या विक्री चालू केली आहे.

अर्सेनिक अल्बम 30 या होमिओपॅथिक आयुष कंपनीच्या गोळ्या रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी उपयुक्त आहेत. त्यामुळे त्यांची मागणी वाढली आहे. मात्र या गोळ्याचा सध्या तरी तुटवडा जाणवत आहे. मात्र याच्यामध्ये देखील मोठा काळा बाजार करताना औषध विक्रते उघड होत आहेत. यामध्ये डेंटॉनिक नावाच्या गोळ्या 50 ते 55 रुपयेला मिळणाऱ्या 200 ते 250 रुपयांना अर्सेनिक अल्बम 30 नावे विकल्या जात आहेत.

धक्कादायक; रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी असलेल्या गोळ्यांचा काळा बाजार, नागरिकांच्या आरोग्याशी खेळ

या गोळ्या होलसेल विक्रते यांच्याकडून मागवून विक्री होऊ लागल्या आहेत. याची विक्री जिल्ह्यातील कोरेगाव, खटाव, फलटण, दहिवडी, म्हसवड, या भागात सर्रास विक्री सुरू आहे. या गोळ्या फक्त बीएचएमएस होमिओपॅथिक डॉक्टर विक्री करू शकतात. तसेच होमिओपॅथिक लायसन्स असणाऱ्या औषध विक्रेते विक्री करू शकतात. मात्र याची विक्री सर्रास औषध विक्रेते करत आहेत. याकडे आरोग्य विभाग व अन्न औषध प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे. अन्यथा नागरिकांच्या आरोग्याशी खेळ पुन्हा होऊ शकतो.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.