ETV Bharat / state

बेकायदेशीर गावठी कट्टा बाळगणाऱ्या युवकास अटक, कराड पोलिसांची कारवाई - कराड पोलीस बातमी

कराडच्या कोल्हापूर नाक्यावर एक युवक संशयितरित्या फिरताना आढळला. पोलिसांना मिहिती मिळताच त्यांनी नाक्यावर पोहचून त्याची झडती घेतली. यावेळी त्याच्याजवळ एक गावठी कट्टा आणि एक जिवंत काडतुस आढळून आले.

बेकायदेशीर गावठी कट्टा बाळगणाऱ्या युवकास अटक

author img

By

Published : Mar 6, 2020, 3:02 AM IST

सातारा - बेकायदेशीर गावठी कट्टा बाळगणाऱ्या युवकास कराडचे डीवायएसपी सूरज गुरव आणि त्यांच्या पथकाने गुरूवारी सायंकाळी पकडले. तेजस दिलीप चव्हाण (रा. रविवार पेठ, कराड), असे त्याचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून एक गावठी कट्टा आणि एक जिवंत काडतुस जप्त केले आहे.

कराडमधील कोल्हापूर नाक्यावर एक युवक संशयास्पदरित्या फिरत असल्याची माहिती डीवायएसपी सूरज गुरव यांना मिळाली. त्यावरून डीवायएसपींनी आपल्या पथकाला सूचना करून कारवाईचे आदेश दिले. डीवायएसपींचे पथक कोल्हापूर नाक्यावर पोहोचले. त्यावेळी एक युवक संशयास्पदरित्या फिरताना आढळला. पोलिसांना पाहताच त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्याला पकडून त्याची झडती घेतली. यावेळी त्याच्या त्याच्या कमरेला गावठी कट्टा आणि पँटच्या खिशात जिवंत काडतुस आढळून आले. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर त्याने आपले नाव तेजस चव्हाण असल्याचे सांगितले.

हेही वाचा - 'त्या' खुनांमागील सुत्रधार सापडतील; डाॅ. हमीद दाभोलकर यांना अपेक्षा

पोलिसांनी त्याला मुद्देमालासह ताब्यात घेऊन अटक केली आहे. दरम्यान, तेजस चव्हाण याच्याकडे याआधीदेखील बिगर परवान्याचे शस्त्र सापडले होते, अशी माहितीही पोलिसांनी दिली.

हेही वाचा - 'कोरोना'च्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळा आणि काळजी घ्या, जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.