सातारा : मुंबई उच्च न्यायालयाने सातारा न्यायालयातील दोन न्यायाधीशांना दणका दिला आहे. एका प्रमुख (प्रिन्सिपल) न्यायाधीशांना पदावनतीला सामोरे जावे लागले आहे. त्यांची पुण्याला तर दुसऱ्या न्यायाधीशांची नागपूरला बदली करण्यात आली आहे. त्यांच्या बदलीचे आदेश देखील काढण्यात आले आहेत.
वकिलांनी टाकला होता बहिष्कार : महिन्यापूर्वी सातारा बार कौन्सिलने प्रमुख सत्र व जिल्हा न्यायाधीश मंगला घोटे आणि तिसरे जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. आर. सालकुटे यांच्यावर काही कारणाने बहिष्कार टाकला होता. तसेच सातारा बार असोसिएशनने हायकोर्टाकडे तक्रार केली होती.
कमिटीच्या अहवालानंतर कारवाई : बार असोसिएशनच्या तक्रारीच्या चौकशीसाठी गेले दोन दिवस उच्च न्यायालयाची कमिटी साताऱ्यात ठाण मांडून होती. चौकशीचा अहवाल उच्च न्यायालयाकडे जाताच उच्च न्यायालयाने प्रमुख सत्र व जिल्हा न्यायाधीश मंगला धोटे यांच्या पदावनतीचे आदेश काढून, त्यांची बदली पुणे येथे जिल्हा न्यायाधीश म्हणून केली आहे. तसेच तिसरे जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. आर. सालकुटे यांना न्यायालयाचे काम सुरु असतानाच बदली आदेशाची प्रत देण्यात आली. बदलीच्या ठिकाणी तात्काळ हजर होण्याचे आदेशही दिले.
बार असोसिएशनची तक्रार : प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मंगला धोटे आणि जिल्हा न्यायाधीश एस. आर. सालकुटे यांच्या कामाबद्दल वकिलांना साशंकता होती. त्यामुळे दोन्ही न्यायाधीशांपुढे कोणतेही कामकाज न चालवण्याचा ठराव घेतला होता. तसेच हायकोर्टाकडे तक्रार केली होती. हायकोर्टाने त्यांच्या प्रतिनिधींच्या कमिटीमार्फत चौकशी करून तसेच वकिलांचे जबाब नोंदवून अहवाल पाठवला होता. त्यावरून दोन्ही न्यायाधीशांची पदावनती आणि बदली करण्यात आली असल्याची माहिती, सातारा बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. विजय देशमुख यांनी दिली.
हेही वाचा -
- Ban On Transfer Of Teachers : शासनाला दणका, शिक्षकांच्या बदली आदेशाला उच्च न्यायालयाची मनाई
- Minor Girl Rape Case: चॉकलेटच्या आमिषाने चिमुरडीवर अत्याचार करून हत्या; कराड न्यायालयाने आरोपीस ठोठावली फाशीची शिक्षा
- Satara Crime : पाकिस्तानी गुप्तहेरांच्या संपर्कातील सातार्याचा आयटी इंजिनिअर; जिल्ह्यात खळबळ