ETV Bharat / state

Heavy Rain In Satara कोयना धोम वगळता सातारा जिल्ह्यातील सर्व धरणे तुडूंब,उमरकांचन गावात शिरले पाणी - Heavy rain in Satara

मुसळधार पावसामुळे सातारा जिल्ह्यातील कोयना धरण ( Koyna Dam Satara ) वगळता सर्व धरणे तुडूंब भरून वाहत आहेत. कण्हेर, उरमोडी, तारळी, बलकवडी, वीर, मोरणा गुरेघर, महिंद ही लहान धरणे पूर्ण क्षमतेने भरल्याने ओव्हरफ्लो झाली आहेत. त्यामुळे धरणांमधून नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात आला असून नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. ढेबेवाडी खोऱ्यातील वांग मराठवाडी, मोरणा गुरेघर या धरणांच्या सांडव्यावरून विसर्ग सुरू असून उमरकांचन गावात पाणी ( Water entered Markanchan village ) शिरले आहे.

Heavy rain in Satara
साताऱ्यात मुसळधार पाऊस
author img

By

Published : Aug 10, 2022, 10:41 PM IST

सातारा.. कोयना धरण ( Koyna Dam Satara ) वगळता सातारा जिल्ह्यातील सर्व धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत. त्यामुळे धरणांमधून नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात आला असून नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. ढेबेवाडी खोऱ्यातील वांग मराठवाडी, मोरणा गुरेघर या धरणांच्या सांडव्यावरून विसर्ग सुरू असून उमरकांचन गावात पाणी ( Water entered Markanchan village ) शिरले आहे. त्यामुळे जलाशयाच्या काठावरील नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे.

पाटणच्या ढेबेवाडी खोऱ्यात पावसाचा जोर पाटण तालुक्यातील ढेबेवाडी खोऱ्यातील वांग-मराठवाडी धरण क्षेत्रात पावसाचा जोर ( Rain continues in Rathwadi dam area ) असल्याने धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी धरणाचे चारही वक्र दरवाजे खुले ठेवण्यात आले आहेत. तसेच धरण जलाशयाच्या काठावरील उमरकांचन गावात पाणी शिरले आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास वांग नदी ( Wang river) धोक्याच्या पातळीवर वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या सर्वच गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच जलाशयाच्या काठावरील उमरकांचन, मेंढ येथील अनेक धरणग्रस्त कुटुंबांचे निवारा शेडमध्ये स्थलांतर करण्यात आले आहे.

हेही वाचा - Mumbai Metro मुंबई मेट्रो २०२३ पर्यंत धावणार

जिल्ह्यातील आठ धरणे ओव्हरफ्लो सातारा जिल्ह्यातील कोयना, वाईजवळचे धोम धरण वगळता कण्हेर, उरमोडी, तारळी, बलकवडी, वीर, मोरणा-गुरेघर, महिंद ही लहान धरणे पूर्ण क्षमतेने भरल्याने ओव्हरफ्लो झाली आहेत. कण्हेर (8219 क्युसेक), उरमोडी (3112 क्युसेक), तारळी (2021 क्युसेक), बलकवडी (2054 क्युसेक), वीर (24,385 क्युसेक) विसर्ग सुरू असून नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. वांग-मराठवाडी आणि मोरणा-गुरेघर या धरणांच्या सांडव्यावरून सुरू असलेल्या विसर्गामुळे वांग आणि मोरणा नद्यांची पाणी पातळी वाढली आहे. Conclusion:फोटो - वांग-मराठवाडी धरणातून विसर्ग सुरू आहे.

हेही वाचा -Monsoon Session कामकाज समितीच्या बैठकीत शिंदे गटाच्या दोघांचा समावेश, शिवसेनेला मोठा धक्का

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.