सातारा : अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना घेऊन येणारे पोलिस पथक साताऱ्यात दाखल झाले. त्यांना शहर पोलिस ठाण्यात आणण्यात आले. यावेळी त्यांनी 'भारत माता कि जय' अशा घोषणा ( Gunaratna Sadavarte chanted Bharat Mataki Jai ) दिल्या. मराठा आरक्षणाच्या ( Maratha Reservation Gunratna Sadavarte ) अनुषंगाने अॅड. सदावर्ते यांनी एका वृत्तवाहिनीवर बोलताना छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज कोल्हापूरचे खासदार संभाजीराजे छत्रपती ( MP Sambhajiraje Chhatrapati ) व सातारचे खासदार उदयनराजे भोसले ( MP Udayanraje Bhosale ) यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. तेढ निर्माण होईल, असे ते वक्तव्य असल्याने गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात सातारा पोलिसांत आॉक्टोबर २०२० मध्ये गुन्हा दाखल ( FIR Against Gunratna Sadavarte ) आहे. या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी सातारा पोलिसांनी अॅड. सदावर्ते यांना ताब्यात घेतले ( Gunratna Sadavarte Arrested By Satara Police ) आहे. प्रथम त्यांना शहर पोलिस ठाण्यात हजर केले जाईल. नंतर न्यायालयापुढे उभे केले जाण्याची शक्यता आहे. शहर पोलिस ठाणे परिसरात पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे.
२०२० मधील दाखल गुन्हा : मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने अॅड. सदावर्ते यांनी एका वृत्तवाहिनीवर बोलताना छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज कोल्हापूरचे खासदार संभाजीराजे छत्रपती व सातारचे खासदार उदयनराजे भोसले यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. तेढ निर्माण होईल, असे ते वक्तव्य असल्याने गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात सातारा पोलिसांत आॉक्टोबर २०२० मध्ये गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात सातारा पोलिसांनी त्यांनी ताब्यात घेतले आहे.