ETV Bharat / state

बँकेत खाते नसणार्‍या बाधितांना शासनाने रोख रक्कम द्यावी- पृथ्वीराज चव्हाण

author img

By

Published : Jul 30, 2021, 4:47 PM IST

अतिवृष्टी आणि महापुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून शेती, घरे, व्यवसायाचे अपरिमित नुकसान झाले आहे. बँकेत खाते असणार्‍या बाधितांच्या खात्यावर भरपाईची रक्कम जमा होईल. परंतु, ज्यांची बँकेत खाती नाहीत, त्यांना शासनाने रोख मदत दिली पाहिजे, अशी मागणी माजी मुख्यमंत्री तथा कराड दक्षिणचे आमदार पृथ्वीराज चव्हाण केली आहे.

पृथ्वीराज चव्हाण
पृथ्वीराज चव्हाण

कराड (सातारा) - अतिवृष्टी आणि महापुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून शेती, घरे, व्यवसायाचे अपरिमित नुकसान झाले आहे. बँकेत खाते असणार्‍या बाधितांच्या खात्यावर भरपाईची रक्कम जमा होईल. परंतु, ज्यांची बँकेत खाती नाहीत, त्यांना शासनाने रोख मदत दिली पाहिजे, अशी मागणी माजी मुख्यमंत्री तथा कराड दक्षिणचे आमदार पृथ्वीराज चव्हाण केली आहे. कराड दक्षिण मतदार संघाचा दौरा करून नुकसानीची त्यांनी पाहणी केली. यावेळी ते बोलत होते. लहान-मोठ्या पुलांची तातडीने दुरूस्ती करावी, अशी सूचनाही त्यांनी अधिकार्‍यांना केली.

अतिवृष्टी आणि महापुरामुळे कराड दक्षिणमधील काले, नांदगाव, उंडाळे, टाळगाव, येळगाव, बांदेकरवाडी, कोळे, येणके, पोतले, आणे या गावांत मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीच्या पाहणीसाठी आमदार चव्हाण यांनी दौरा केला. त्यांच्या समवेत कराडचे प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसिलदार अमरदीप वाकडे, गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार, सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे उपअभियंता संजय दाभोळे, आर. जे. पाटील, तालुका कृषी अधिकारी रियाज मुल्ला, जलसंपदा विभागाचे संजय धोत्रे, जलसंधारणाचे श्रीकांत आढाव, महावितरणचे कार्यकारी अभियंता, कराड दक्षिण काँग्रेसचे अध्यक्ष मनोहर शिंदे, युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शिवराज मोरे उपस्थित होते.

'ज्यांची बँकेत खाती नाहीत, त्यांना शासनाने रोख रक्कम द्यावी'

अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांना थेट खात्यावर भरपाईची रक्कम जमा करण्याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय झाला आहे. अशा बाधितांना भरपाई मिळण्यास काही अडचण येणार नाही. परंतु, ज्यांची बँकेत खाती नाहीत, त्यांना शासनाने रोख रक्कम दिली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. दरम्यान, प्रशासकीय यंत्रणेने नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करावेत. जेणेकरून बाधितांना लवकरात लवकर भरपाई मिळण्यास मदत होईल. नागरीकांना मदत मिळण्यास काही अडचणी आल्यास मी त्यात स्वत: लक्ष घालेन, अशी ग्वाही देखील पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.

पुलाचा भराव, बंधार्‍यांच्या सांडव्याच्या दुरूस्तीचे दिले आदेश

कराड दक्षिणमधील नुकसानीच्या पाहणी दौर्‍यात काले गावातील दक्षिण मांड नदीवरील पुलाची पाहणी करून पुलाची उंची वाढविण्यासंदर्भात आमदार चव्हाण यांनी प्रशासकीय अधिकार्‍यांशी चर्चा केली. नांदगाव येथील सुमारे शंभर लोकांना स्थलांतरीत करावे लागले आहे. त्यांच्याबद्दलची माहिती त्यांनी घेतली. नांदगाव येथे नवीन पूल उभारण्याची मागणी यावेळी ग्रामस्थांनी केली. उंडाळे-जिंती मार्गावरील पुलाचा भराव आणि बंधार्‍यांच्या सांडव्याच्या दुरूस्तीचे आदेशही चव्हाण यांनी दिले.

ट्रॅक्टर ट्रॉलीतून केली पुलाची पाहणी
उंडाळे खोऱ्यातील बांदेकरवाडी येथील पुलाची पाहणी करण्यासाठी आमदार पृथ्वीराज चव्हाण हे प्रशासकीय अधिकाऱ्यांसमवेत ट्रॅक्टर ट्रॉलीतून गेले. अजूनही पुलावर एक दोन फूट पाणी असल्यामुळे चव्हाण यांनी पुरामुळे झालेल्या नुकसानीची ट्रॅक्टर ट्रॉलीतून जावून पाहणी केली.

पृथ्वीराज चव्हाणांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत ट्रॅक्टर ट्रॉलीतून केली पाहणी

हेही वाचा - Video : नादचं केलाय थेट! कौटुंबिक वादातून चक्क सासुरवाडीतच तरूण चढला विद्यूत टॉवरवर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.