सातारा - माण-खटाव मतदारसंघात गुरूवारी भाजपचे उमेदवार जयकुमार गोरे यांची उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी जाहीर सभेत गोपीचंद पडळकर यांनी पवारांवर जोरदार हल्ला चढवला आहे. शरद पवार जर माढ्यातून लढत असतील, रोहीत जर कर्जत-जामखेडमधुन व पार्थ जर मावळमधून निवडणूक लढवत असतील तर मी बारामतीमधून का लढायचं नाही? मी काय पाकिस्तानमधून आलो आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
हेही वाचा - पुण्यात चंद्रकांत पाटीलांनी शक्ती प्रदर्शन करत भरला उमेदवारी अर्ज
पडळकर म्हणाले, दुष्काळी भागाला पडलेले जयकुमार गोरे हे स्वप्न आहे. महाराष्ट्रातील प्रस्थापीतांना सर्वसामान्य कुटुंबातील मुलगा आमदार व्हावा असे वाटत नव्हते. त्याला कुठल्यातरी केसमध्ये आडकवण्याचा डाव होता.
खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी माण खटावच्या ६४ गावचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केला. पक्षाबरोबर गद्दारी करणाऱ्यांना पक्ष लाथा घालून हाकलून देतील. पक्षात राहून पक्षविरोधी काम कराल तर याद राखा, आत्मचिंतन करा. पक्ष आपणास सन्मानाची वागणूक देईल. आमचं ठरलंयवाल्यांना सांगायचय ज्या नेतृत्वाला हा तालुका हिरवागार करायचा आहे. अशा कल्पक नेतृत्वाच्या पाठीशी जनतेने रहावे. दुष्काळीभागाचा विकास करण्यासाठी माणमध्ये रेल्वे आणणार असेही पडळकर म्हणाले.
हेही वाचा - राम शिंदे आव्हान नसून मतदारसंघातील प्रश्न सोडवणे हे माझ्या पुढील आव्हान - रोहित पवार