ETV Bharat / state

संजयकाका काँग्रेसमध्ये जातील, या भीतीनेच भाजपने त्यांना उमेदवारी दिली- गोपीचंद पडळकर

संजयकाका पाटीलही काँग्रेसमध्ये जातील, या भीतीपोटीच भाजपने आमदारांचा विरोध असतानाही त्यांना पुन्हा उमेदवारी दिली. असा गौप्यस्फोट वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.

गोपीचंद पडळकर
author img

By

Published : Apr 3, 2019, 10:50 PM IST

Updated : Apr 4, 2019, 6:20 AM IST

सांगली - नाना पटोलेंप्रमाणेच संजयकाका पाटीलही काँग्रेसमध्ये जातील, या भीतीपोटीच भाजपने आमदारांचा विरोध असतानाही त्यांना पुन्हा उमेदवारी दिली. असा गौप्यस्फोट वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. ते सांगलीतील प्रचाराच्या शुभारंभ कार्यक्रमात बोलत होते.

गोपीचंद पडळकर

वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार पडळकर यांनी आज जोरदार शक्तिप्रदर्शन करत आपल्या प्रचाराचा नारळ फोडला. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नेते जयसिंग शेंडगे, माजी आमदार प्रकाश शेंडगे यांच्यासह स्थानिक नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. उमेदवार अर्ज दाखल केल्यानंतर त्यांनी पुष्पराज चौकातून शहरातील प्रमुख रस्त्यावरून रॅली काढत आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला. यावेळी सभेत बोलताना पडळकरांनी भाजप आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या उमेदवारांवर जोरदार टीका केली. मी निवडणूक लढवणार नाही, असे अनेकांना वाटत होते. मला उमेदवारी मिळू नये म्हणून प्रयत्न केले गेले. मात्र, त्या सर्वांना या ठिकाणी जमलेली जनता उत्तर आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

ही निवडणूक जनशक्ती विरुद्ध धनशक्ती, अशी आहे. मी तुमचा सालगडी म्हणून ५ वर्ष काम करेन त्यामुळे मला वापरून घ्या, असे स्पष्ट करताना पडळकर म्हणाले, २०१४ मध्ये संजयकाका पाटलांना त्यांच्या घरातील लोकांनी मतदान केले नाही पण माझ्या कार्यकर्त्यांनी मतदान केले. त्यामुळे यावेळी पाटील यांनी आता मला मतदान करावे, संजयकाका पाटील पैरा फेडतात असे ऐकून आहे, त्यामुळे पाटील यांनी या निवडणुकीतून आपला अर्ज माघारी घ्यावा. तसेच विशाल पाटलांनीही आपली अब्रु वाचवायची असेल तर आपला उमेदवारी अर्ज मागे घ्यावा, असे आवाहनही पडळकरांनी केले. संजयकाका पाटलांवर टीका करताना पाटलांना कोण ओळखते असा सवाल करत, ४ महिन्यापर्यंत डॉन असणाऱ्या संजय पाटलांना आता काळे कुत्रेसुद्धा विचारत नाहीत. असा टोलाही पडळकर यांनी लगावला.

पडळकरांनी विशाल पाटलांवरही निशाणा साधला. ते म्हणाले, त्यांनी स्वतःच्या भावाचे काँग्रेसमधून तिकीट कापले आणि आपल्या भावाकडे पैसे नसल्याचे उघड केले होते, त्यामुळे आपल्या भावाचे प्रकरण उघड करणारे जनतेचा विकास कसा करणार? माझे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संबंधित असणारे हाफ चड्डीतील फोटो विशाल पाटील यांनी व्हायरल केले. पण मला काही फरक पडत नाही, कारण जनता माझ्याबरोबर आहे, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

Intro:सरफराज सनदी - सांगली .

AVBB

FEED SEND - FILE NAME -
R_MH_1_SNG_03_APR_2019_VANCHINT_PRACHAR_SABHA_SARFARAJ_SANADI - TO - R_MH_6_SNG_03_APR_2019_VANCHINT_PRACHAR_SABHA_SARFARAJ_SANADI

स्लग - संजय पाटील काँग्रेस मध्ये जातील या भीतीने भाजपाकडून पुन्हा उमेदवारी - गोपीचंद पडळकर .

अँकर - भाजपातील आमदारांचा विरोध असतानाही,केवळ नाना पटोले प्रमाणे संजयकाका पाटील काँग्रेसमध्ये जातील, या भीतीपोटी त्यांना भाजपाकडून पुन्हा उमेदवारी देण्यात आली.असा गौप्यस्फोट वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.तसेच डॉन असणाऱ्या संजय पाटलांना आता काळे कुत्रे सुद्धा विचारत नाही,अशी घणाघाती टिकाही पडळकर यांनी केला आहे.
सांगलीतील प्रचार शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.

Body:व्ही वो - वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांनी आज जोरदार शक्तिप्रदर्शन करत आपल्या प्रचाराचा नारळ फोडला आहे.वंचित बहुजन आघाडीचे नेते जयसिंग शेंडगे,माजी आमदार प्रकाश शेंडगे यांच्यासह स्थानिक नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.उमेदवार अर्ज दाखल केल्यानंतर शहरातील पुष्पराज चौकातुन शहरातील प्रमुख रस्त्यावरून रॅली काढत आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला.यावेळी सभेत बोलताना गोपीचंद पडळकर यांनी भाजपा आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या उमेदवारांवर जोरदार टीका केली.मी निवडणूक लढवणार नाही,असे अनेकांना वाटत होतं.आणि मला उमेदवारी मिळू नये म्हणुन प्रयत्न केले.आणि त्या सर्वानाय ठिकाणी जमलेली जनता उत्तर आहे. असं मत व्यक्त करत निवडणूक जनशक्ती विरुद्ध अशी आहे.आणि मी मोकळा आहे.त्यामुळे मी तुमचा सालगडी म्हणून पाच वर्ष काम करेन त्यामुळे मला वापरून घ्या, असे स्पष्ट करत. खासदार संजय काका पाटील यांच्यावर निशाणा साधत मी 2001 14 मध्ये संजय काका पाटलांना मतदान केले त्या घरातल्यांनी मतदान केले तर माझ्या कार्यकर्त्यांनी मतदान केले त्यामुळे माझा हक्क आहे,त्यामुळे संजयकाका पाटील यांनी आता मला मतदान करावं, संजयकाका पाटील पैरा फेडतात असा ऐकून आहे, त्यामुळे खासदार संजय पाटील यांनी या निवडणुकीतून आपला अर्ज माघारी घ्यावा तसेच विशाल पाटील यांनीही आपली अब्रू वाचवायचे असेल तर त्यांनीही उमेदवारी अर्ज मागे घेऊन मला बिनविरोध करावं असा आव्हान यावेळी पडळकर यांनी केले आहे.तर संजयकाका पाटलांच्यावर टीका करताना संजय पाटलांना कोण ओळखतं असा सवाल करत,चार महिन्या पर्यंत डॉन असणाऱ्या संजय पाटलांना आता काळं कुत्रं सुद्धा विचारत नाही.असा टोला लगावत संजयकाका पाटील यांना जिल्ह्यातील भाजपाच्या आमदारांचा विरोध असताना भाजपामधून जी उमेदवारी मिळाली.ती केवळ नाना पटोले प्रमाणे संजयकाका काँग्रेस मध्ये जातील या भीतीपोटी देण्यात आली आहे.असा गौप्यस्फोट पडळकर यांनी केला आहे.तर विशाल पाटील यांच्यावरही निशाणा साधताना पडळकर यांनी विशाल पाटलांनी आपल्या स्वतःच्या भावाचं काँग्रेसमधून तिकीट कापलं,व आपल्या भावाकडे पैसे नसल्याचे उघड केले होते, त्यामुळे आपल्या भावाचे उघड करणारे जनतेचा के विकास करणार,असा टोला लगावत. माझ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संबंधित असणारे हाफ चड्डीतील फोटो विशाल पाटील यांनी व्हायरल केले.पण मला काही फरक पडत नाही,कारण माझ्या बरोबर आहे.असं मत गोपीचंद पडळकर यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

बाईट - गोपीचंद पडळकर - वंचित बहुजन आघाडी, सांगली लोकसभा.

Conclusion:
Last Updated : Apr 4, 2019, 6:20 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.