ETV Bharat / state

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या ४० जागाही निवडूण येणार नाहीत - गिरीश महाजन

२८८ पैकी ४० जागाही निवडूण येणार नाहीत. ईतकी वाईट परिस्थिती काँग्रेस आणि राष्ट्रवादीची झाली आहे, असे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी म्हटले आहे.

सभेत बोलताना जलसंपदा मंत्री महाजन
author img

By

Published : Sep 17, 2019, 10:02 PM IST

Updated : Sep 17, 2019, 10:11 PM IST

सातारा - संपूर्ण देश हा भाजपमय झाला असून महाराष्ट्रही भाजपमय होत आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षात कोणीही राहायला तयार नाही. मी दरवेळी जेवढा आकडा सांगतो तेवढ्या जागा निवडून येतात. यावेळी मी सांगतो की, २८८ पैकी त्यांच्या ४० जागाही निवडूण येणार नाहीत. ईतकी वाईट परिस्थिती काँग्रेस आणि राष्ट्रवादीची झाली आहे, असे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी म्हटले आहे.

सभेत बोलताना गिरीश महाजन

कै. लक्ष्मणराव इनामदार जिहेकठापूर जलसिंचन योजेनेद्वारे आंधळी धरणातून माण तालुक्याच्या उत्तर भागातील 32 गावांना पाणी देण्याच्या कामांचे भूमिपूजन केल्यानंतर दहीवडी येथे आयोजित भाजपच्या जाहीर सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, माण-खटावचे प्रभारी सदाशिव खाडे, धैर्यशील कदम, भिमराव पाटील, भाजपाचे माण तालुकाध्यक्ष बाळासाहेब खाडे, खटाव तालुकाध्यक्ष विकल्प शहा, नगराध्यक्ष दिलीपभाऊ जाधव यांसह दोन्ही तालुक्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती.

ते पुढे म्हणाले, की पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी काश्मीरमधील ३७० कलम हटवून एकसंघ भारताची कल्पना प्रत्यक्षात साकारली आहे. जगातील सर्वच देशांनी मोदींच्या निर्णयाचे समर्थन केले आहे. देशाला आणि राज्याला त्यांनी प्रगतीपथावर नेले आहे. मुख्यमंत्र्यांच्या धडाकेबाज कामगिरीमुळे पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील दुष्काळ लवकरच हटणार आहे. माण-खटावमधून तिकीट कुणाला द्यायचेय ते मुख्यमंत्र्यांनी ठरवले आहे. जयकुमार गोरेंना मोठे समर्थन करणाऱ्या जनतेच्या मनात जे आहे तेच घडणार आहे. त्यामुळे जयभाऊंच्या पाठीशी आणखी मोठी ताकद उभी करा, असे आवाहन करत त्यांनी जयकुमार गोरेंच्या उमेदवारीला हिरवा कंदील दाखवला.

यावेळी खासदार रणजीतसिंह नाईक-निंबाळकर म्हणाले, मला खासदार करताना जयकुमार गोरेंना मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द आज पूर्ण झाला आहे. आज भूमिपूजन करण्यात आलेली पाणीयोजना जयकुमार गोरेंनीच मांडली आणि त्यासाठी निधी मिळवून कामही सुरु केले. माणदेशी मातीचा स्वाभिमान जागृत ठेवत इथला दुष्काळ हटविण्यासाठी रात्रंदिवस झटणारे जयाभाऊंचे नेतृत्व आता राज्यस्तरावर चमकणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कुणाचं काहीही ठरलं असलं तरी आमचे जयकुमार गोरेंना लाखाच्या मताधिक्याने निवडून आणायचे ठरले असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

यावेळी जयकुमार गोरे म्हणाले, जनतेने माझ्यावर टाकलेली पाणी आणण्याची जाबाबदारी रात्रंदिवस प्रयत्न करुन मी पार पाडली आहे. उरमोडीचे पाणी दोन्ही तालुक्यातील ९७ गावांमध्ये पोहोचले आहे. आज उत्तर माणच्या ३२ आणि मायणी, कुकुडवाडसह ३२ गावांचा पाणीप्रश्न मुख्यमंत्री आणि जलसंपदा मंत्र्यांनी मार्गी लाऊन आपल्यासाठी ऐतिहासिक भेट दिली आहे. २ तालुक्यातील काही वाजंत्री एकत्र आले आहेत. जयकुमारने काय केले असे ते विचारत आहेत. हजारो साखळी सिमेंट बंधारे, गावोगावी मुख्य आणि अंतर्गत डांबरी रस्ते, पाणीपुरवठा योजना, समाजमंदिरे, ग्रामपंचायत इमारती अशी हजारो कोटींची मी केलेली विकासकामे त्यांना दिसत नाहीत. उरमोडीचे पाणी आणले म्हणून आज मतदारसंघात साखरकारखाने दिसत आहेत. लोधवडे, निमसोडकराच्या ऊसालाही मी आणलेलेच पाणी जाते. एका टेंडऱ्याने उत्तर माणची योजनाच मंजूर असेल तर जयकुमारच्या घरी चाकरी करेन असे जाहीरपणे सांगितले होते. मी ही योजना मांडल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी विक्रमी वेळेत सुधारीत प्रशासकीय मान्यता देत २८४ कोटींचा निधीही दिल्याने आज त्याच योजनेचे जलसंपदा मंत्र्यांनी भूमिपूजन केले आहे. आता त्याने माझी घरी चाकरी करावी. जनतेला भूलथापा द्यायचे बंद करावे. किरकसाल बोगद्याच्या एका बाजूला आमचं ठरलय टीम उभी केली तर मी आणलेल्या उरमोडीच्या पाण्याच्या प्रेशरने सगळे ढाकणीच्या तलावातच दिसतील, असा टोलाही त्यांनी लगावला. टेंभूचे पाणी खटाव माणमधील ३२ गावांना देण्यासाठी पाण्याचे फेरवाटप होत आहे. ३०० कोटींची तरतूद झाल्याने या भागाचा दुष्काळही लवकरच हटणार आहे.

Intro:सातारा- देशाला आणि राज्याला प्रगतीच्या शिखरावर नेणाऱ्या नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाची सर्वत्र मोठी क्रेझ आहे. खटाव आणि माणचा दुष्काळ हटविण्यासाठी त्यांनी मास्टरप्लॅन आखला आहे. कामेही सुरु केली आहेत. येणाऱ्या दोन वर्षात माणच्या उत्तर भागातील 32 गावांना जिहेकठापूरचे आणि मायणी, कुकुडवाडसह 32 गावांना टेंभूचे पाणी देणारच असा विश्वास जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला. माण - खटावमधून मुख्यमंत्र्यांनी ठरवल्याप्रमाणे भाजपाकडून जयकुमार गोरेच लढतील आणि आमदारही होतील असे सांगून त्यांनी उमेदवारीबाबतचा सस्पेन्स संपवून टाकला.
Body:कै. लक्ष्मणराव इनामदार जिहेकठापूर जलसिंचन योजेनेद्वारे आंधळी धरणातून माण तालुक्याच्या उत्तर भागातील 32 गावांना पाणी देण्याच्या कामांचे भूमिपूजन केल्यानंतर दहीवडी येथे आयोजित भाजपाच्या जाहीर सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, माण - खटावचे प्रभारी सदाशिव खाडे, धैर्यशील कदम, भिमराव पाटील, भाजपाचे माण तालुकाध्यक्ष बाळासाहेब खाडे, खटाव तालुकाध्यक्ष विकल्पशेठ शहा, नगराध्यक्ष दिलीपभाऊ जाधव, धीरज दवे, अर्जुनतात्या काळे, अरुण गोरे, अतुल जाधव, सुवर्णाताई साखरे दोन्ही तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची मोठी उपस्थिती होती.

ना. गिरीश महाजन पुढे म्हणाले, पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी काश्मीरमधील 370 कलम हटवून एकसंघ भारताची कल्पना प्रत्यक्षात साकारली आहे.जगातील सर्वच देशांनी मोदींच्या निर्णयाचे समर्थन केले आहे. देशाला आणि राज्याला त्यांनी प्रगतीपथावर नेले आहे. मुख्यमंत्र्यांच्या धडाकेबाज कामगिरीमुळे पश्चिम महाराष्ट्र आणि माराठवाड्यातील दुष्काळ लवकरच हटणार आहे. माण - खटावमधून तिकीट कुणाला द्यायचेय ते मुख्यमंत्र्यांनी ठरवले आहे. जयकुमार गोरेंना मोठे समर्थन करणाऱ्या जनतेच्या मनात जे आहे तेच घडणार आहे त्यामुळे जयाभाऊंच्या पाठीशी आणखी मोठी ताकद उभी करा असे अवाहनही त्यांनी केले.

खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर म्हणाले, मला खासदार करताना जयकुमार गोरेंना मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द आज पूर्ण झाला आहे. आज भूमिपूजन करण्यात आलेली पाणीयोजना जयकुमार गोरेंनीच मांडली आणि त्यासाठी निधी मिळवून कामही सुरु केले. माणदेशी मातीचा स्वाभिमान जागृत ठेवत इथला दुष्काळ हटविण्यासाठी रात्रंदिवस झटणारे जयाभाऊंचे नेतृत्व आता राज्यस्तरावर चमकणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कुणाचंकाहीही ठरलं असलं तरी आमचे जयकुमार गोरेंना लाखाच्या मताधिक्याने निवडून आणायचे ठरले असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

मा. आ. जयकुमार गोरे म्हणाले, जनतेने माझ्यावर टाकलेली पाणी आणण्याची जाबाबदारी रात्रंदिवस प्रयत्न करुन मी पार पाडली आहे. उरमोडीचे पाणी दोन्ही तालुक्यातील 97 गावांमध्ये पोहचले आहे. आज उत्तर माणच्या 32 आणि मायणी, कुकुडवाडसह 32 गावांचा पाणीप्रश्न मुख्यमंत्री आणि जलसंपदा मंत्र्यांनी मार्गी लाऊन आपल्यासाठी ऐतिहासिक भेट दिली आहे. दोन तालुक्यातील काही वाजंत्री एकत्र आले आहेत. जयकुमारने काय केले असे ते विचारत आहेत. हजारो साखळी सिमेंट बंधारे, गावोगावी मुख्य आणि अंतर्गत डांबरी रस्ते, पाणीपुरवठा योजना, समाजमंदीरे, ग्रामपंचायत इमारती अशी हजारो कोटींची मी केलेली विकासकामे त्यांना दिसत नाहीत. जयकुमारने उरमोडीचे पाणी आणले म्हणून आज मतदारसंघात साखरकारखाने दिसत आहेत. लोधवडे, निमसोडकराच्या ऊसालाही मी आणलेलेच पाणी जाते. एका टेंडऱ्याने उत्तर माणची योजनाच मंजूर असेल तर जयकुमारच्या घरी चाकरी करेन असे जाहीरपणे सांगितले होते. मी ही योजना मांडल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी विक्रमी वेळेत सुधारीत प्रशासकीय मान्यता देत 284 कोटींचा निधीही दिल्याने आज त्याच योजनेचे जलसंपदा मंत्र्यांनी भूमिपूजन केले आहे. आता त्याने माझी घरी चाकरी करावी. जनतेला भूलथापा द्यायचे बंद करावे. किरकसाल बोगद्याच्या एका बाजूला आमच ठरलय टीम उभी केली तर मी आणलेल्या उरमोडीच्या पाण्याच्या प्रेशरने सगळे ढाकणीच्या तलावातच दिसतील असा टोलाही त्यांनी लगावला. टेंभूचे पाणी खटाव माणमधील 32 गावांना देण्यासाठी पाण्याचे फेरवाटप होत आहे. तीनशे कोटींची तरतूद झाल्याने या भागाचा दुष्जाळही लवकरच हटणार आहे. विरोधकांनी वाघाशेजारी वाघच रहातो हे ध्यानात ठेवावे. जयकुमार दोस्ती आणि दुष्मनीही इमाने इतबारे करतो. जनतेच्या विश्वासावर पुढील पंधरा वर्षे आमदारकीच्या फाटीला निष्क्रीय विरोधकांना स्पर्श करु देणार नाही असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
माण खटावचे प्रभारी सदाशिवराव खाडे, शिवाजीराव शिंदे यांनीही मनोगते व्यक्त करताना जयकुमार गोरेंच्या पाठीशी ताकद उभी करण्याचे अवाहन केले.
Conclusion:
Last Updated : Sep 17, 2019, 10:11 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.