ETV Bharat / state

प्रजासत्ताक दिनापासून साताऱ्यात मिळणार 'शिवभोजन थाळी' - सातारा जिल्हा पुरवठा अधिकारी स्नेहा किसवे-देवकाते न्यूज

शहरात प्रजासत्ताक दिनापासून चार ठिकाणी १० रुपयात 'शिवभोजन थाळी' उपलब्ध होणार आहे. या शिवभोजन थाळीमध्ये दोन चपात्या, एक वाटी भाजी, एक मूद भात आणि एक वाटी वरणाचा समावेश असेल.

सातारा जिल्हाधिकारी कार्यालय
सातारा जिल्हाधिकारी कार्यालय
author img

By

Published : Jan 24, 2020, 8:54 PM IST

सातारा - शहरात प्रजासत्ताक दिनापासून चार ठिकाणी १० रुपयात 'शिवभोजन थाळी' उपलब्ध होणार आहे. सातारा एसटी कॅन्टीन येथे १५० थाळी, जिल्हा परिषद कार्यालय भोजनालय येथे १५०, बेंद्रे स्नॅक्स, मोती चौक येथे १०० आणि क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात १०० याप्रमाणे दररोज ५०० थाळी प्रायोगिक तत्त्वावर तीन महिन्यांच्या कालावधीसाठी देण्यात येणार आहेत. जिल्हा पुरवठा अधिकारी स्नेहा किसवे-देवकाते यांनी या बाबत माहिती दिली.

थाळी मिळण्याची वेळ दुपारी १२ ते २ -
एसटी स्टँडवरील कॅन्टीनमध्ये शिवभोजन केंद्राचे उद्घाटन प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते होणार आहे. या शिवभोजन थाळीमध्ये दोन चपात्या, एक वाटी भाजी, एक मूद भात आणि एक वाटी वरणाचा समावेश असेल. ही थाळी दहा रुपयांत मिळणार आहे. भोजनालयाची वेळ दुपारी १२ ते २ असून या भोजनालयात बाहेरचे जेवण घेऊन येण्यास आणि भोजनालयातील जेवण बाहेर घेवून जाण्यास मनाई असेल. एका लाभार्थ्याला एकावेळी एकापेक्षा जास्त थाळी मिळणार नाही.

हेही वाचा - 'शरद पवार म्हणजे सह्याद्रीचा पहाड, लोकांचे प्रेम हेच त्यांचे सुरक्षा कवच'

फोटो-मोबाईल नंबरची नोंद -
शासकीय कर्मचाऱ्यांना आणि ज्या ठिकाणी ही योजना राबवण्यात येत आहे तेथील आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांना सवलतीच्या दरात भोजन घेता येणार नाही. शिळे किंवा खराब अन्नाची जबाबदारी भोजनालय चालकाची असेल. भोजनालय चालक शासनाच्या 'महाअन्नपूर्णा' या मोबाईल अ‌ॅपवर प्रत्येक लाभार्थ्याचा फोटो, माहिती आणि मिळाल्यास मोबाईल नंबरची नोंद ठेवणार आहे.

पोषक पदार्थ, स्वच्छ परिसर आणि गुणवत्तापूर्ण भोजन ही त्रिसूत्री यासाठी अवलंबली जाणार आहे. जास्तीत जास्त गरीब आणि गरजू व्यक्तींनी सवलतीच्या दरातील भोजनाचा लाभ घेवून ही योजना यशस्वी करावी, असे आवाहन साताऱ्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.

Intro:सातारा : जिल्ह्याचे मुख्यालयाचे ठिकाण असलेल्या सातारा शहरात प्रजासत्ताक दिनापासून ४ ठिकाणी अवघ्या १० रुपयात शिवभोजन थाळी उपलब्ध होणार आहे.
Body:दररोज ५०० थाळी
जिल्हा पुरवठा अधिकारी स्नेहा किसवे-देवकाते यांनी या बाबतची माहिती दिली. शिवभोजन एसटी कॅन्टीन येथे रोज १५० थाळी, जिल्हा परिषद ऑफिस कॅटींन येथे १५०, बेंद्रे स्नॅक्स मोती चौक येथे १०० व क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात १०० याप्रमाणे दररोज ५०० थाळी भोजन प्रायोगिक तत्वावर तिमाही कालावधीसाठी देण्यात येणार आहे.

भोजन १२ ते २

एसटी स्टँडवरील कॅन्टीनमध्ये शिवभोजन केंद्राचे उद्घाटन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते २६ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता होणार आहे. या थाळीत २ चपात्या, १ वाटी भाजी, 1 मूद भात व १ वाटी वरण समाविष्ट असेल. ही थाळी अवघ्या १० रुपयांत मिळणार आहे.

एकास एकावेळी एकच थाळी

भोजनालयाची वेळ दुपारी १२ ते २ असून या भोजनालयात बाहेरचे जेवण घेऊन येण्यास व भोजनालयातील जेवण बाहेर घेवून जाण्यास मनाई असेल. एका लाभार्थ्याला एकावेळी एकापेक्षा जास्त वेळा थाळी मिळणार नाही.

फोटो-मोबाईल नंबरची नोंद

शासकीय कर्मचा-यांना तसेच ज्या ठिकाणी ही योजना राबविण्यात येत आहे तेथील आस्थापनेवरील कर्मचा-यांना सवलतीच्या दरात भोजन घेता येणार नाही. शिळे अथवा खराब अन्नाची जबाबदारी भोजनालय चालकाची असेल. भोजनालय चालक शासनाच्या 'महाअन्नपूर्णा' या मोबाईल अॅपवर प्रत्येक लाभार्थ्याचा फोटो, माहिती व असल्यास मोबाईल नंबरची नोंद ठेवणार आहे.

पोषक पदार्थ, स्वच्छ परिसर व गुणवत्तापूर्ण भोजन ही त्रिसुत्री त्यासाठी अवलंबिली जाणार आहे. जास्तीत जास्त गरीब व गरजू व्यक्तींनी सवलतीच्या दरातील भोजनाचा लाभ घेवून ही योजना यशस्वी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.

------------------------------------Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.