ETV Bharat / state

Shambhu Mahadev Yatra Satara: सातार्‍यातील शंभू महादेव यात्रेत दुर्घटना; कावडीसह चौघेजण मुंगी घाटात कोसळले! - शिंगणापुर येथील श्री शंभू महादेवाची शिखर यात्रा

सातार्‍यातील शिखर शिंगणापूरच्या शंभू महादेव यात्रेसाठी कावड घेऊन येताना चौघे जण मुंगी घाटातून खाली कोसळले. दुर्घटना समोर आल्यानंतर सह्याद्री ट्रेकर्सच्या जवानांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली. चौघांनाही घाटातून वर आणून उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले आहे.

Shambhu Mahadev Yatra Satara
सातार्‍यातील शंभू महादेव यात्रा
author img

By

Published : Apr 3, 2023, 10:10 AM IST

चौघे जण मुंगी घाटातून खाली कोसळले

सातारा : सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील शिंगणापुर येथील श्री शंभू महादेवाची शिखर यात्रा ही मोठ्या उत्साहात सुरु झाली आहे. या यात्रेसाठी राज्यभरातून लाखो भाविक कावडीसह दाखल होतात. रविवारी यात्रेसाठी भाविक डोंगर चढून मुंगी घाटातून वर येत होते. त्यावेळी चौघेजण कावडीसोबत घाटातून खाली कोसळले. यावेळी उपस्थित असणार्‍या सह्याद्री ट्रेकर्सच्या जवानांनी त्यांना तातडीने घाटातून वर काढून रूग्णालयात दाखल केले. पाडव्याच्या मुहुर्तावर हळदीच्या कार्यक्रमाने यात्रेला सुरूवात झाली आहे.

महादेवाच्या पिंडीला अभिषेक : चैत्र शुध्द पंचमीस श्रींचा विवाह सोहळा असतो. त्यासाठी मुंगी घाटातून हजारो कावडी गड चढून वर आणल्या जातात. सासवड येथील मानाची तेल्याभुत्याची कावड ही रात्री उशीरा गडावर पोहचते. त्या कावडीतील पाण्याने महादेवाच्या पिंडीला अभिषेक घातला जातो. राज्यभरातील भाविक कावड घेऊन गडावर चढतात. गडावर पोहचल्यानंतर त्यातील पाण्याने महादेवाच्या पिंडीला अभिषेक घातला जातो.

आंध्र प्रदेश, कर्नाटकातील भाविकांची उपस्थिती : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिखर शिंगणापूरच्या श्री शंभू महादेव यात्रेला गुढी पाडव्याच्या मुहुर्तावर पारंपारिक पध्दतीने सुरूवात झाली आहे. सातार्‍यापासून पूर्वेकडे 90 किलोमीटर अंतरावर शिखर शिंगणापूर येथे श्री शंभू महादेव देवस्थान आहे. महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश आणि कर्नाटक या राज्यातूनही मोठ्या संख्येने भाविक या यात्रेला हजेरी लावतात. शंभू महादेव आणि देवी पार्वती यांचा विवाह सोहळा हा यात्रेतील मुख्य उत्सव असतो.

यात्रेमुळे प्रचंड वाहतूक कोंडी : छत्रपती घराण्याचे कुलदैवत असलेल्या शिखर शिंगणापूर यात्रेला लाखो भाविकांनी उपस्थिती लावली आहे. भाविकांच्या प्रचंड गर्दीमुळे देवस्थानकडे येणार्‍या सर्व मार्गांवर वाहतूक कोंडी झाली आहे. रात्री उशीरापर्यंत वाहतूक कोंडी कायम राहणार आहे. मंदिरापासून दहीवडीजनीकच्या थदाळे आणि फलटण मार्गावरील कोथाळे गावापर्यंत ट्रॅफीक जाम झाले आहे. शिंगणापुर येथील श्री शंभू महादेवाची शिखर यात्रा ही खूप प्रसिद्ध आहे.

शिर्डीतील दुर्घटना : शिर्डीमध्ये देखील यात्रेत दुर्घटना घडली. शिर्डीत रामनवमी यात्रेदरम्यान पाळणा तुटल्याने चार जण गंभीर जखमी झाले होते. या दुर्घटनेत ज्योती किशोर साळवे (वय ४५), किशोर पोपट साळवे (वय ५०) यांच्या पायांना मोठी गंभीर दुखापत झाली होती. याशिवाय भूमी अंबादास साळवे (वय १४) हिला डोक्याला जखम झाली होती. तसेच प्रविण अल्हाट, (४५) हा तरुणही जखमी झाला होता. यामुळे यात्रेतील सुरक्षिततेवर प्रश्न उपस्थित होत आहे.

हेही वाचा : Helicopter Crash at Cochin Airport : तटरक्षक दलाचे हेलिकॉप्टर कोचीन विमानतळावर कोसळले; एक जखमी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.