ETV Bharat / state

Road Accident : दोन अपघात! माय-लेकरासह चौघे जागीच ठार, तर एकजण गंभीर जखमी - कोल्हापूर जिल्ह्यात माय लेकर अपघातात ठार

सातारा जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या अपघातांच्या घटनांमध्ये चौघे जण ठार तर एक जण गंभीररित्या जखमी झाला आहे. या अपघातांमध्ये माय-लेकरासह अन्य दोन तरूणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Nov 6, 2022, 8:00 PM IST

Updated : Nov 6, 2022, 9:28 PM IST

सातारा - जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या अपघातांच्या घटनांमध्ये चौघे जण ठार तर एक जण गंभीररित्या जखमी झाला आहेत. या अपघातामध्ये माय-लेकरासह अन्य दोन तरूणांना आपला जीव गमवावा लागला. लता नारायण चव्हाण, मुलगा निखिल नारायण चव्हाण (रा. वडाचे म्हसवे, ता. जावळी) आणि सुजित संतोष खरात आणि देवदत्त मोहन सपकाळ (रा. चिमणगाव, ता. कोरेगाव), अशी मृतांची नावे आहेत. नवनाथ राऊत हा गंभीररित्या जखमी झाला आहे.

आजारी आजीला भेटण्यापुर्वीच काळाचा घाला - आजारी आईला भेटण्यासाठी लता चव्हाण या मुलगा निखिल याच्यासोबत दुचाकीवरून माहेरी कापशी बिबीला निघाल्या होत्या. त्यांच्या दुचाकीला समोरून येणार्‍या ओमनी कारने भीषण धडक दिली. या अपघातात लता चव्हाण आणि निखिल या माय-लेकरांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच वडाचे म्हसवे गावावर शोककळा पसरली. निखिल या तरूणाचा प्रगतशील शेतकरी म्हणून म्हसवे परिसरात नावलौकीक होता. या अपघाताची नोंद वाठार स्टेशन पोलीस ठाण्यात झाली आहे.

ट्रॅक्टर ट्रॉली-कार अपघातात दोघांचा मृत्यू - पुसेगाव-कोरेगाव मार्गावर गोळेवाडी गावच्या हद्दीत ट्रॅक्टर ट्रॉली आणि कारचा रात्री भीषण अपघात होऊन कारमधील सुजित संतोष खरात, देवदत्त मोहन सपकाळ आणि नवनाथ राऊत हे तीन जण गंभीररित्या जखमी झाले. त्यांना सातारा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना सुजित आणि देवदत्त या दोघांचा मृत्यू झाला तर गंभीर जखमी असलेल्या नवनाथ याच्यावर अद्याप उपचार सुरू आहेत. या अपघाताची नोंद कोरेगाव पोलीस ठाण्यात झाली आहे.

Last Updated : Nov 6, 2022, 9:28 PM IST

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.