सातारा - दहिवडी तालुका माण (भवानवाडी) गोंदवले बुद्रुकनजिक वन विभागाच्या वनक्षेत्राला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. ही आग मोठी असल्याने सुमारे ४०० ते ५०० युवा कार्यकर्त्यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. या आगीत २० ते २५ एकर क्षेत्रावरील वनविभाग आणि खाजगी मालकीचे क्षेत्र जळाले आहे.
वनविभागाचे अधिकारी देखील घटनास्थळी दाखल झाले होते. या ठिकाणी शेकडो वृक्ष जळून खाक झाले आहेत. कोरोनामुळे अनेक नागरिक घरीच असल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.