सातारा - महाबळेश्वर तालुक्यातील भिलार या गावामध्ये घाणेरडा प्रकार घडला आहे. पुस्तकाचे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱया या गावातील केंब्रिज हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना अश्लील चित्रफीत दाखवणे व वेळोवेळी मारहाण केल्याची प्रकार उघडकीस आला आहे. यासंबंधी केंब्रिज हायस्कूलच्या दोन कर्मचार्यांविरोधात पाचगणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा - 'आधी शहराचे प्रश्न सोडवा, नंतर आम्ही स्वतः नाव बदलाय मदत करू'
सुरज भिलारे (रा. सोमर्डी, ता. जावळी) व स्वप्नील कदम (रा, कळमगाव ता. महाबळेश्वर) यांच्यावर पालक तानाजी शांताराम साबळे (रा. निमगिरी, ता. जुन्नर जि. पुणे) यांनी पोक्सो अंतर्गत यांनी तक्रर दाखल केली होती. तसेच 11 पीडित विद्यार्थ्याच्या पालकांनी सातारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. हा गुन्हा आता झिरो नंबरने पाचगणी पोलीस ठाण्याला हस्तांतरीत करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहीतीनुसार, भिलार येथील केंब्रिज हायस्कूलची अदिवासी शाळा आहे. या शाळेतील 13 विद्यार्थी शाळेच्या त्रासांला कंटाळून भोसेच्या डोंगरातून पळून जाताना काही तरुणांना दिसले. ही बाब लक्षात आल्यानंतर त्या मुलांना गाडीमध्ये घेवून पाचगणी पोलीस ठाण्याच्या तांब्यात देण्यात आले. भिलार येथील केंब्रिज हायस्कुलचे हे 13 विद्यार्थी भोसेच्या डोंगरातून जाताना भोसे गावचे युवक अजित गोळे, तुषार गोळे, कुलदीप गोळे, लखन गोळे या युवकांना दिसले होते. यानंतर पाचगणी पोलीस ठाण्यात आणल्यावर 11 आदिवासी विद्यार्थ्यांनी त्यांच्यावर होणार्या तक्रारींचा पाढा वाचून दाखवताना, शिक्षक भितीवर डोके आपटतात, बांबुने मारतात, जेवण वेळेवर मिळत नाही, अशा तक्रारी पोलीस ठाण्यात मांडल्या.
पाचगणी पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास बडवे यांनी या मुलांना जिल्हा बालसंरक्षण अधिकाऱ्यांच्या तांब्यात देणार असल्याची माहीती दिली. पाचगणी पोलीस ठाण्याकडून विद्यार्थ्यांचे जबाब नोंदवून पुढील कार्वावाही करीता अहवाल अहवाल जिल्हा संरक्षण अधिकार्यांकडे पुढे पाठण्यात आले. जिल्हा बालसंरक्षण अधिकारी यांनी चैाकशी केली आहे. अधिक तपास उपविभागीय अधिकारी अजित टिके करत आहेत.
हेही वाचा - 'कीर्तनातून 'निवृत्ती'? आता फेटा उतरवून करणार 'शेती'