ETV Bharat / state

ट्रकमधून प्रवास करणाऱ्या १० जणांवर कराडमध्ये गुन्हा दाखल; ट्रकही ताब्यात - कराड सातारा

लॉकडाऊनमुळे परराज्यातील मजूर महाराष्ट्रात अडकले आहेत. अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे प्रत्येकाला आपआपल्या घरी जायचे आहे. त्यासाठी अनेकजण छुप्या पद्धतीने प्रवास करत आहेत.

karad satara latest news  कराड सातारा लेटेस्ट न्युज  कराड सातारा  लॉकडाऊन इफेक्क
फाईल फोटो
author img

By

Published : Apr 20, 2020, 8:14 PM IST

सातारा - जमावबंदी आणि संचारबंदीत काळात ट्रकमधून लपून प्रवास करणाऱ्या १० जणांवर कराड ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तसेच त्यांचा ट्रक देखील ताब्यात घेतला आहे.

लॉकडाऊनमुळे परराज्यातील मजूर महाराष्ट्रात अडकले आहेत. अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे प्रत्येकाला आपआपल्या घरी जायचे आहे. त्यासाठी अनेकजण छुप्या पद्धतीने प्रवास करत आहेत. पुणे-बंगळुरू आशियाई महामार्गावरील मालखेड फाटा येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक भापकर यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत नाकाबंदी केली होती. त्यावेळी तेथून निघालेला ट्रक (के. ए. 14 सी 0197) पोलिसांनी थांबविला. ट्रकची तपासणी केली असता ट्रकमध्ये दहाजण प्रवास करत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी त्यांच्यावर जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. तसेच संबंधित ट्रकही पोलिसांनी ताब्यात घेतला.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.