ETV Bharat / state

स्वतःच्या मुलाचा खून करणाऱ्या पित्याला जन्मठेप; कौटुंबिक कलहातून घडला होता प्रकार - Satara district court

आठ वर्षाच्या मुलाला विष पाजून त्याची हत्या करणाऱ्या पित्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. जिल्हा प्रमुख न्यायाधीश आर. डी. सावंत यांनी त्या पित्याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. ही सुनावणी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग वर घेण्यात आली.

Satara district court
Satara district court
author img

By

Published : May 6, 2021, 6:35 PM IST

सातारा - पती-पत्नीमधील कलहातून संतप्त झालेल्या पित्याने दारूच्या नशेत स्वतःच्या आठ वर्षांच्या मुलाला विष पाजून त्याचा खून केला होता. याप्रकरणी जिल्हा प्रमुख न्यायाधीश आर. डी. सावंत यांनी त्या पित्याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. ही सुनावणी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगवर घेण्यात आली. शिवराज संतोष भिंगारे (वय 8) असे खून झालेल्या मुलाचे नाव असून संतोष लक्ष्मण भिंगारे (वय 35, सध्या पाचवड, ता. वाई) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या पित्याचा नाव आहे. न्यायालयापुढे आलेले पुरावे आणि साक्षीदार यांनी दिलेली साक्ष ग्राह्य मानून न्यायालयाने संतोष भिंगारे याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सरकारी पक्षाच्या वतीने ऍड. नितीन मुके यांनी काम पाहिले.

काय आहे प्रकरण…

संतोष वैशाली भिंगारे यांना दोन मुले होती. पती-पत्नीमध्ये कौटुंबिक कारणातून वारंवार वाद होत होता. यातूनच पत्नी दोन्ही मुलांसह माहेरी कडेगाव (सांगली) येथे राहत होती. पती पाचवड येथे राहत होता. शिवराज कडेगाव येथील शाळेत जात होता. 4 मार्च 2017 रोजी संतोष भिंगारे याने कडेगाव येथील शिवराजच्या शाळेत जाऊन त्याला जबरदस्तीने पळवून नेले. यावेळी शाळेतील शिक्षकांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीही त्याने शिवराजला घेऊन कडेगाव येथून पलायन केले. संतोषने शिवराजला भुईंज येथे आणले. तोपर्यंत शिक्षकांनी वैशाली भिंगारे यांना या घटनेची माहिती दिली. वैशाली यांनी कडेगाव पोलिसात धाव घेतली. पित्याने भुईंजमध्ये आणल्यानंतर शिवराजला विष पाजले व स्वतःही विष पिऊन फोनवर याची माहिती पत्नीला दिली. दरम्यान दोघांनाही जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र शिवराजचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. मुलाच्या मृत्यूनंतर भुईंज पोलिस ठाण्यात वैशाली भिंगारे यांनी खुनाची फिर्याद दिली. पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास केला. संतोष भिंगारे याची प्रकृती सुधारल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.