सातारा - छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या विरोधात माजी खासदार श्रीनिवास पाटील व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची नावे आज चर्चेत आहेत. मात्र, पृथ्वीराज चव्हाण यांनी मात्र नकार दिला आहे. उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिल्यानंतर भाजपचा झेंडा हाती घेतला. त्यामुळे सातारा लोकसभेची जागा रिकामी आहे. येथून उदयनराजे यांच्या विरोधात आघाडीकडून कोणता उमेदवार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा - 'छत्रपती' ही उपाधी महत्वाची; त्या मागचा व्यक्ती नाही, रोहित पवारांचा उदयनराजेंना टोला
लोकसभेची जागा मी लढवणार नाही, असे स्पष्ट करत कराड दक्षिणेतूनच विधानसभा लढवणार असल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे.
२००९ साली कराड लोकसभा मतदारसंघ विलीन झाल्यानंतर सातारा लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात आला. त्यावेळी छत्रपती उदयनराजे भोसले यांना राष्ट्रवादीने संधी दिली. त्यानंतर आजपर्यंत तेच खासदार आहेत. चव्हाण म्हणाले, "मी लोकसभा लढवणार नाही. कोणीतरी माझ्या नावाची विनाकारण चर्चा करत आहे. मात्र, त्याचा माझ्याशी कसलाही संबंध नाही. मी विधानसभा निवडणूक कराड दक्षिणेतून लढणार आहे. त्यामुळे कोणताही संभ्रम ठेवू नका."
हेही वाचा - बारामतीत काय कलम ३७० लागू आहे का? - मुख्यमंत्री