कराड (सातारा) - विधीमंडळात आज मांडलेला महाराष्ट्राचा अर्थसंकल्प हा एक समतोल ( Maharashtra Budet 2022 ) अर्थसंकल्प आहे. मागील दोन वर्षात कोरोनाची महामारी आणि त्यामुळे लावण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे बंद होऊन आर्थिक नुकसान झाले. अशा परिस्थितीत देखील महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेने १७.९% (चालू किंमत) विकासदर ( Maharashtra GDP ) नोंदविला. गुजरात, कर्नाटक य सारख्या मोठ्या राज्यांपेक्षा महाराष्ट्राचा विकासदर अधिक आहे. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था कोविडच्या अरीष्टातून बाहेर पडून पुन्हा एकदा वेगाने वाढत असल्याचे हे द्योतक आहे, अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त ( Prithviraj Chavan reaction on Maharashtras budget ) केली आहे.
विकासाची पंचसूत्री आश्वासक...
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण ( Prithviraj Chavan reaction on Maharashtras budget ) म्हणाले, की वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेसाठी अर्थमंत्र्यांनी विकासाची पंचसूत्री प्रस्तावित ( Five formulas for MH budget ) केली आहे. कृषी, आरोग्य, मनुष्यबळ विकास, दळणवळण आणि उद्योग या क्षेत्रांकडे विशेष भर देऊन भांडवली खर्चात मोठी वाढ केली आहे. तीन वर्षात भांडवली खर्च दुप्पट झाला आहे. त्याचा वापर पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी होणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी नमूद केले आहे. ही आश्वासक बाब असल्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे.
पोषण आहारात थेट हस्तक्षेप अतिशय गरजेचा
कृषी क्षेत्रात शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान आणि निर्यात धोरण ( Maharashtra Export Policy ) तयार केल्याने कृषी क्षेत्राच्या वाढीस चालना मिळेल. तसेच आरोग्य सुविधांसाठी नवीन रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालये आणि वाढीव खाटांची तरतूद केल्याने बळकटी प्राप्त होईल. २०१५-२० या कालावधीत राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षणानुसार महाराष्ट्रातील कुपोषित तसेच अतितीव्र कुपोषित बालकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली होती. त्यामुळे मनुष्यबळ विकासासाठी अंगणवाडीस्तरावर पोषण आहारात थेट हस्तक्षेप अतिशय गरजेचा होता. तो आता होणार असल्याने कुपोषित बालकांची संख्या कमी होईल, असा विश्वास पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.
हेही वाचा-Maharashtra budget 2022 : जाणून घ्या अर्थसंकल्पातील ठळक मुद्दे; विरोधी पक्षनेत्यांनी का व्यक्त केला आनंद?
बांधकाम क्षेत्राला चालना, रोजगार निर्मितीस होणार मदत..
पायाभूत सुविधा क्षेत्रात सीएनजीवरील कर कमी करणे, मेट्रो, रेल्वे आणि महामार्ग तसेच रस्ते आणि पूलबांधणीसाठीच्या भरीव तरतुदींमुळे बांधकाम क्षेत्राला चालना मिळून रोजगार निर्मितीस मदत होईल. उद्योग क्षेत्रात विशेषतः सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांचे कोरोना काळात सर्वाधिक नुकसान झाले. अनेक उद्योग बंद पडले. राज्य सरकारने अशा बंद पडलेल्या उद्योगांचे सर्वेक्षण करून त्यांना पुन्हा सुरू करण्यासाठी प्रोत्साहनपर निधीची तरतूद केली पाहिजे, असे मतदेखील पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले आहे.
अर्थव्यवस्थेवरील संभाव्य परिणामांवर अर्थमंत्र्यांनी सूतोवाच करायला हवे होते...
आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या किमतीत वाढ झाल्याने केंद्र सरकार पेट्रोल, डिझेल, एलपीजीच्या भावात वाढ करणार आहे. परिणामी महागाई वाढणार असून महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेवर होणाऱ्या संभाव्य परिणामांबद्दलदेखील अर्थमंत्र्यांनी सुतोवाच करणे गरजेचे होते, असेही पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे.
24 हजार 353 कोटीची महसुली तूट असलेला अर्थसंकल्प
राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत आज राज्याचा 2022 चा अर्थसंकल्प सादर केला. तत्पुर्वी त्यांनी महाराष्ट्र हे 1 ट्रिलियनची अर्थव्यवस्था असणारे पहिले राज्य असेल असे स्पष्ट केले होते. 24 हजार 353 कोटीची महसुली तूट असलेला अर्थसंकल्प त्यांनी सादर केला. 4लाख 3 हजार 427 कोटी महसुली जमा तर 4 लाख 27 हजार 780 कोटी अंदाजित महसुली खर्च असल्याचे तसेच 2021-22 वर्षाच्या सुधारित अंदाजात 24 हजार 353 कोटी महसुली तूट येत असल्याचे अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केले.