सातारा - तापामुळे मी सलाईनवर होतो. तरीही महापुराच्या परिस्थितीत मी पूरग्रस्त लोकांना धीर आणि मदतीचा हात दिला. परंतु, आपण ज्यांच्या प्रचारासाठी आलात, ते महापूर परिस्थितीत कुठे होते, असा सवाल आमदार शंभूराज देसाईंनी शरद पवारांना केला आहे.
शंभूराज म्हणाले, आजारपण कुणाला सांगून येत नाही. महापूराच्यावेळी मला डेंग्यू झाला होता. तापामुळे मी सलाईनवर होतो. तरीही महापुराच्या परिस्थितीत मी पूरग्रस्त लोकांना धीर ॉ दिला. परंतु, आपण ज्यांच्या प्रचारासाठी आलात, ते महापूर परिस्थितीत तालुक्यातच नव्हे, तर देशातही नव्हते. पूरस्थितीवेळी ते कुठे होते, याचे उत्तर प्रथम द्या आणि मगच त्यांच्यासाठी मते मागा. देसाई यांनी विरोधकांच्या पाटण या बालेकिल्ल्यात विराट शक्तीप्रदर्शन केले. त्यावेळी झालेल्या सांगता सभेत ते बोलत होते.
हेही वाचा - ज्या योद्ध्याजवळ उमेद आहे, तो कधीही हारू शकत नाही; सोशल मीडियावर पवारांचा ट्रेंड
पाच वर्षात आश्वासनांची पूर्तता करूनच जनतेच्या दारात मते मागायला आलो आहे. मागील निवडणुकीत पाटण तालुक्यातील जनतेने मला सातारा जिल्ह्यात सर्वाधिक मताधिक्क्य दिले होते. आता सातारा जिल्ह्यातच नव्हे, तर पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्क्य देण्यासाठी जनतेने सज्ज व्हावे, असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. यावेळी शंभूराजेंच्या मातोश्री श्रीमती विजयादेवी देसाई, सातारा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विक्रमबाबा पाटणकर, जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती यु. टी. माने, शिवसेना जिल्हाप्रमुख जयंवतराव शेलार, पाटणचे नगरसेवक सागर माने, भैय्यासाहेब पाटणकर, जिल्हा परिषद सदस्य प्रदीप पाटील आदी उपस्थित होते.