ETV Bharat / state

राज्यासमोर भारनियमनाचे संकट.. कोयनेतून होणारी वीजनिर्मिती बंद

कोयना धरणात केवळ १० टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे वीज निर्मिती ठप्प करण्याचे आदेश जलसंपदामंत्री विजय शिवतारे यांनी दिले आहेत. पाणीसाठी कमी झाल्याने काही भागात पाणीटंचाई भासणार असल्याचे निदर्शनास येताच तिसऱ्या टप्प्यातील वीजनिर्मिती कमी दाबाने सुरू आहे.

कोयनेतून होणारी वीजनिर्मिती ठप्प
author img

By

Published : May 31, 2019, 8:05 PM IST

सातारा - कोयना धरणात केवळ १० टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे वीज निर्मिती ठप्प करण्याचे आदेश जलसंपदामंत्री विजय शिवतारे यांनी दिले आहेत. पाणीसाठी कमी झाल्याने वीजनिर्मिती बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

धरणातील पाणीसाठी कमी झाल्याने काही भागात पाणीटंचाई भासणार असल्याचे निदर्शनास येताच तिसऱ्या टप्प्यातील वीजनिर्मिती कमी दाबाने सुरू आहे. मात्र, त्यातून १२० मेगावॅट इतकी अत्यल्प वीजनिर्मिती होणार आहे. एकूण 1 हजार 956 क्षमता असलेल्या या प्रकल्पातील वीजनिर्मिती एवढ्या मोठ्या प्रमाणात बंद होण्याची ही पहिलीच वेळ आहे. आगामी काळात राज्याला अघोषित भारनियमनास सामोरे जावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. धरणात अत्यल्प पाणीसाठा असल्याने वीजनिर्मिती पूर्णपणे बंद करण्याचे आदेश जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारेंनी जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याची माहिती, सातारा सिंचन मंडळाचे अधीक्षक अभियंता वैशाली नारकर यांनी दिली. पुढील आदेश प्राप्त झाल्यावर वीजनिर्मिती चालू करावी, असे पत्र महानिर्मिती कंपनीला दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

याबाबत कोयना विद्युत प्रकल्पाचे मुख्य अभियंता मोरे म्हणाले, की पश्चिमेकडील १९६० मेगावॅट वीजनिर्मिती पैकी १८२० वीजनिर्मिती बंद केली आहे. जलविद्युत प्रकल्पाचे ६०० मेगावॅट क्षमतेचे एक व दोन टप्पे २४ तास चालवले जाणार आहेत. त्यातून ४० मेगावॅट आणि ३२० मेगावॅट क्षमतेचा टप्पा क्रमांक ३ मधून ८० मेगावॅट अशी १२० मेगावॅट वीजनिर्मिती दररोज ५ तास करण्यात येणार आहे.

Intro:सातारा कोयना धरणात केवळ दहा टक्के पाणीसाठा शिल्लक राहिल्याने टंचाई आढावा बैठकीत साताऱ्याचे पालकमंत्री विजय शिवतारे यांनी वीज निर्मिती बंद करण्याचे आदेश दिले होते. त्यावरून कोयनेतील वीजनिर्मिती बंद करण्यात आले आहे. काही भागात पाणीटंचाई भासणार असल्याचे निदर्शनास येताच तिसऱ्या टप्प्यातील वीज निर्मिती कमी दाबाने सुरू आहेत. मात्र त्यातून 120 मेगावॅट इतकी अत्यल्प वीज निर्मिती होणार आहे. एकूण 1956 क्षमता असलेल्या या प्रकल्पातील वीजनिर्मिती एवढ्या मोठ्या प्रमाणात बंद होण्याची ही पहिलीच वेळ असून आगामी काळात राज्याला अघोषित भारनियमनास सामोरे जावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Body:सातारा सिंचन मंडळाचे अधीक्षक अभियंता वैशाली नारकर म्हणाल्या धरणात अत्यल्प पाणीसाठा असल्याने वीजनिर्मिती पूर्णपणे बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांना जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी दिले आहेत. पुढील आदेश प्राप्त झाल्यावर वीजनिर्मिती चालू करावी असे पत्र महानिर्मिती कंपनीला दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

धरणात सध्या 11.39 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. धरणातून पूर्वेकडील सिंचन गृहातून 34.45 व धरणाच्या आपत्कालीन चक्र दरवाज्यातून 4:50 टीएमसी असा एकूण 38.9 टीएमसी पाणीसाठा सोडण्यात आला आहे. सिंचनाला प्रथम प्राधान्य असल्याने धरणातून प्रतिदिन 3 हजार 100 क्युसेक्स पाणी देण्यात येते. सिंचन व वीज निर्मितीला देण्यात येणाऱ्या पाण्यामुळे धरणात पाच टीएमसी पाणीसाठा राखीव ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. धरणात केवळ दहा टक्के पाणीसाठा शिल्लक राहिल्याने एक जून पासून पाणी कपात करणे ऐवजी पश्चिमेकडील वीजनिर्मिती पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी व सिंचन मंडळाने महानिर्मितीला काढले आहेत.

याबाबत कोयना विद्युत प्रकल्पाचे मुख्य अभियंता मोरे म्हणाले पश्चिमेकडील 1960 मेगावॅट वीजनिर्मिती पैकी 1820 वीजनिर्मिती बंद केले आहे. जलविद्युत प्रकल्पाचे 600मेगावॅट क्षमतेचे एक व दोन टप्पे 24 तास चालूवून त्यातून 40 मेगावॅट आणि 320 मेगावॅट क्षमतेचा टप्पा क्रमांक 3 मधून 80 मेगावॅट अशी 120 मेगावॅट वीजनिर्मिती दररोज पाच तास करणार आहोत.

please use old video etv bharat news

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.