ETV Bharat / state

कराड, पाटण तालुक्यांतील 8 जण कोरोनामुक्त; कृष्णा रुग्णालयातून टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज

उपचाराअंती बरे झाल्याने कराडच्या कृष्णा रुग्णालयातून आज 8 रुग्णांना टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज देण्यात आला. या कोरोनामुक्तांमध्ये कराड तालुक्यातील 6 आणि पाटण तालुक्यातील 2 जणांचा समावेश आहे.

कराड, पाटण तालुक्यातील 8 जण कोरोनामुक्त
कराड, पाटण तालुक्यातील 8 जण कोरोनामुक्त
author img

By

Published : Jun 22, 2020, 6:30 PM IST

सातारा - जिल्ह्याच्या कराड येथील कृष्णा रुग्णालयातून आज 8 कोरोनामुक्त रुग्णांना टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज देण्यात आला. त्यामध्ये कराड तालुक्यातील 6 आणि पाटण तालुक्यातील 2 रुग्णांचा समावेश आहे. आत्तापर्यंत कृष्णा रुग्णालयातील एकूण 214 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

जिल्ह्यात आज आणखी 8 जण कोरोनामुक्त झाले असून त्यांना टाळ्यांच्या गजरात कृष्णा रुग्णालयातून निरोप देण्यात आला आहे. कोरोनामुक्त झालेल्यांपैकी कराड तालुक्यातील वडगाव-उंब्रज येथील 86 वर्षीय पुरुष, पाल येथील 55 वर्षीय पुरुष, तुळसण येथील 51, 50 आणि 40 वर्षीय पुरुष, केसे येथील 64 वर्षीय पुरुष तर, पाटण तालुक्यातील उरूल येथील 26 वर्षीय पुरुष आणि जांबेकरवाडी येथील 30 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. आज त्यांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने आज त्यांना टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज देण्यात आला. या कोरोनामुक्त व्यक्तींचा मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी कृष्णा रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. ए.वाय. क्षीरसागर, त्वचारोग तज्ज्ञ डॉ. मोहन काळे, डॉ. बाळकृष्ण निकम, कामगार कल्याण अधिकारी अश्विनी शेटे, औषध विभागप्रमुख उत्तम जाधव, रश्मी कुलकर्णी, चंद्रकांत मोहिते, सिव्हिल सुपरवायझर दिलीप काशीद, डॉ. संजय पाटील यांच्यासह हॉस्पिटलचे कर्मचारी उपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.