ETV Bharat / state

'त्या' खुनांमागील सुत्रधार सापडतील; डाॅ. हमीद दाभोलकर यांना अपेक्षा - kalburgi murder

दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश या चारही खुनांमध्ये 'कॉमन सेट ऑफ पिस्तूल' वापरली आहे. त्यामुळे, एकातील पिस्तूल सापडल्यास उर्वरित गुन्ह्यांवर प्रकाश पडू शकतो, असे डॉ. हामीद दाभोलकर यांनी सांगितले.

dr. hamid dabholkar
डाॅ. हमीद दाभोलकर
author img

By

Published : Mar 5, 2020, 9:51 PM IST

सातारा - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाच्या अनुषंगाने वापरले गेलेले पिस्तूल तपास यंत्रणांना सापडले आहे. त्यामुळे, आता दाभोलकरच नव्हे तर कॉम्रेड पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश या चारही खुनांमागील सुत्रधार तपास यंत्रणांना सापडतील, अशी अपेक्षा डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे चिरंजीव डॉ. हमीद दाभोलकर यांनी आज माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.

प्रतिक्रिया देताना डाॅ. हमीद दाभोलकर

डॉ. हामीद दाभोलकर म्हणाले, डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाच्या अनुषंगाने ज्या पिस्तूलचा शोध केंद्रीय तपास यंत्रणा घेत होते, ते सापडल्याची बातमी माध्यमांतून समजली. तपासाच्या दृष्टीने ही महत्त्वाची घटना आहे. दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी आणि गौरीलंकेश या चारही खुनांमध्ये 'कॉमन सेट ऑफ पिस्तूल' वापरली आहे. त्यामुळे, एकातील पिस्तूल सापडल्यास उर्वरित गुन्ह्यांवर प्रकाश पडू शकतो. या गुन्ह्यांमधील मारेकरी सापडलेच आहेत. परंतु, त्यामागील सूत्रधार सापडतील, अशी अपेक्षा आहे. राज्य आणि केंद्र शासन ही अपेक्षा पूर्ण करेल, असा विश्वास डॉ. हमीद दाभोलकर यांनी व्यक्त केला.

हेही वाचा- कर्नाटक सरकारच्या दोन बस जप्त; अपघातातील मृतांना भरपाई देण्याचे न्यायालयाचे आदेश

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.