सातारा : वीज बिल वसुलीसाठी कनेक्शन तोडण्याची कारवाई महावितरणकडून केली जात आहे. थकबाकीची रक्कम टप्प्याटप्प्याने भरण्याची सवलत देऊन कंपनीने महामारीने त्रस्त असलेल्या जनतेला दिलासा द्यावा, अन्यथा संघर्ष अटळ आहे असा गर्भित इशारा खासदार उदयनराजे भोसलेंनी दिला आहे.
वीजेअभावी विद्यार्थ्यांचे नुकसान
दिल्लीसारख्या राज्यात वीज बिल काही युनिटपर्यंत पूर्ण माफ आहे. तिथे ठराविक युनिटपर्यंत वीज मोफत पुरवली जाते. त्या राज्याचे प्रतियुनिट दरही खूप कमी आहेत. देशात महावितरण कंपनी ही निश्चितच अग्रेसर राहिली आहे. कोरोना काळातही वीज कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी अखंड वीजपुरवठा करण्याचे वाखाणण्यासारखे काम केले आहे. त्यामुळे पाणी पुरवठाही सुरळीत राहिला. महाराष्ट्राच्या गरजेपैकी जवळजवळ निम्मी वीज सातारा जिल्ह्यात तयार होते. कोरोना महामारीने गेले वर्षभर जनजीवन विस्कळीत झाले आहे. कौटुंबिक गरजा भागविताना जवळजवळ सर्वांची तारेवरची कसरत होत आहे. कोरोनामुळे बहुतांश शैक्षणिक कामे ऑनलाइन सुरू आहेत. वीजपुरवठा नसेल तर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे असे उदयनराजेंनी म्हटले आहे.
वीज ग्राहकांचे दुहेरी नुकसान
सध्या शहरी भागासह ग्रामीण भागातील बहुतांश कामे ही वीजेवर चालतात. कोरोनामुळे लॉकडाऊनच्या काळात वीज कंपनीने वीजबिलांचे सुद्धा वाटप केले नव्हते. तीन-चार महिन्यांची बिले एकत्रितपणे कालांतराने दिल्याने ती भरताना कौटुंबिक आर्थिक नियोजन ढासळले. एकत्रित वीज बिल दिल्याने एकूण युनिट वाढले आणि युनिट दर जास्त लागला. यामध्ये वीज ग्राहकांचे दुहेरी नुकसान झाले आहे. या परिस्थितीत थकित वीज बिल टप्प्याटप्प्याने भरण्याबाबत स्थानिक पातळीवर निर्णय घेण्यात यावा किंवा धोरणात्मक निर्णय मंडळाने घ्यावा असे उदयनराजेंनी म्हटले आहे.
कनेक्शन तोडण्याची कारवाई मान्य नाही
कोरोनासारख्या जागतिक महामारीत वीज थकबाकीमुळे कनेक्शन तोडण्याची कारवाई होणार असेल, तर ते कदापि मान्य होणार नाही. अशा वेळी आम्ही वीज ग्राहकांच्या बाजूने ठाम उभे राहणार आहोत. तसेच अशा कारवाईत कोणाकोणाची वीज तोडली याचा आढावा घेऊन त्याबाबतचा जागेवरच सोक्षमोक्ष लावताना संघर्ष अटळ ठरेल, असा इशाराही खासदार उदयनराजे भोसले यांनी दिला आहे.
...तर संघर्ष अटळ! वीज बिलाच्या मुद्द्यावरून उदयनराजेंचा इशारा - Udayan Raje
कोरोनामुळे बहुतांश शैक्षणिक कामे ऑनलाइन सुरू आहेत. वीजपुरवठा नसेल तर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे असे उदयनराजेंनी म्हटले आहे.