सातारा: कृषी औद्योगिक महोत्सवाच्या Agri Industrial Festival उद्घाटन कार्यक्रमात खासदार उदयनराजे भोसले MP Udayanaraje Bhosale हे शेतकऱ्यांच्या व्यथा मांडताना आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. आज आपण खूर्चीत बसतोय. पण, उद्या वाडगं घेऊन बसावे लागेल, असा राज्यकर्त्यांना इशारा देत व्यासपीठावरून खाली उतरत पाऱ्यावर येऊन त्यांनी मांडी घातली आहे.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर उदयनराजेंचा संताप साताऱ्यातील छत्रपती कृषी औद्योगिक महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमात खासदार उदयनराजे भोसले हे शेतकऱ्यांच्या व्यथा मांडताना आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्यास देशाचे तुकडे व्हायला वेळ लागणार नाही. आज आपण खूर्चीत बसतोय. पण, उद्या वाडगं घेऊन बसावे लागेल, असा राज्यकर्त्यांना इशारा देत व्यासपीठावरून खाली उतरत पाऱ्यावर येऊन त्यांनी मांडी घातली आहे.
लोक सत्ता हाती घेतील आज आपण खूर्चीत बसतोय. उद्या हातात वाडगं घेऊन बसावे लागेल, असा राज्यकर्त्यांना इशारा देत उदयनराजे म्हणाले, लोक स्वतःच्या हातात सत्ता घेतील आणि म्हणतील लोकप्रतिनिधी व प्रशासनाला आम्ही ओळखत नाही. अशी परिस्थिती देशाची होऊ देऊ नका. हे सर्व देशवासियांच्या हातात आहे. सर्वात मोठी लोकशाही असलेला देश, असे आपण छातीठोकपणे सांगतो. परंतु, देशात सर्व जाती, धर्माचे लोक राहतात, हे देखील लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्यास देशाचे तुकडे व्हायला वेळ लागणार नाही.