ETV Bharat / state

जिल्ह्यात दोन ठिकाणी उत्पादन शुल्कचे छापे, दीड लाखांची दारू जप्त

author img

By

Published : May 27, 2021, 7:54 AM IST

राज्य उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सातारा जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने सर्व अबकारी अनुज्ञप्ती दिनांक 24 रोजी सायंकाळी पाच वाजल्यापासून बंद केल्या आहेत. या कालावधीमध्ये मद्याची बेकायदेशीर निर्मिती, वाहतूक व विक्री याला आळा घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक अनिल चासकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम राबवण्यात आली.

राज्य उत्पादन शुल्क विभाग
राज्य उत्पादन शुल्क विभाग

सातारा : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सातारा येथील भरारी पथकाने पुसेगाव (ता.खटाव) व सोकासन (ता.माण) येथे छापा टाकून सुमारे दीड लाख रुपये किंमतीची दारू जप्त केली. या प्रकरणी चौघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

बेकायदेशीर साठ्यावर छापे

उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सातारा जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने सर्व अबकारी अनुज्ञप्ती दिनांक 24 रोजी सायंकाळी पाच वाजल्यापासून बंद केल्या आहेत. या कालावधीमध्ये मद्याची बेकायदेशीर निर्मिती, वाहतूक व विक्री याला आळा घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक अनिल चासकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम राबवण्यात आली. उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाने दिनांक 25 रोजी जिल्ह्यातील पुसेगाव (ता.खटाव) व सोकासन (ता. माण) येथे बेकायदेशीर देशी-विदेशी मद्य साठ्यावर छापे टाकले.

चौघांविरुद्ध गुन्हा

पुसेगाव येथून नसरुद्दीन अमानुल्ला मुल्ला (वय 29), सोकासन येथून अनिल शिवाजी बोडरे (वय 30), अविनाश जगन्नाथ भोसले (वय 30) व एक अज्ञात व्यक्ती यांच्या ताब्यातून एकूण देशी दारूचे 37 बॉक्स, विदेशी दारुचे सहा बॉक्स व बियरचे दोन बॉक्स असा एकूण एक लाख 45 हजार 40 रुपये किंमतीचा दारूसाठा जप्त करण्यात आला. याप्रकरणी चौघांवर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमध्ये निरीक्षक आर. एल. पुजारी, दुय्यम निरीक्षक नंदू क्षीरसागर, नितीन जाधव, महेश मोहिते, संतोष निकम, अजित रसाळ, जीवन शिर्के, सचिन खाडे, किरण जंगम यांनी भाग घेतला. निरीक्षक आर. एल. पुजारी तपास करत आहेत.

हेही वाचा-मराठा आरक्षण : खासदार संभाजी राजेंनी सामूहिक नेतृत्त्वात सहभागी व्हावे - राधाकृष्ण विखे पाटील

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.