ETV Bharat / state

पावसाच्या संततधारेमुळे द्राक्षबागांचं नुकसान, शासनाची मदतीची शेतकऱ्यांची मागणी - satara rain update

यंदा दुष्काळाचा मोठा फटका या फळबागांना बसला. या बागा जगवण्यासाठी या शेतकर्यांनी दुसऱ्या जिल्ह्यातून टँकरने पाणी विकत आणुन त्यांचे संगोपन केले होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे या बागा पुर्णपणे उद्ध्वस्त झाल्या आहेत.

पावसाच्या संततधारेमुळे द्राक्षबागांचं नुकसान, शासनाची मदतीची शेतकऱ्यांची मागणी
author img

By

Published : Nov 6, 2019, 3:01 AM IST

सातारा - जिल्ह्यात गत काही दिवसांपासुन सुरू असलेल्या पावसाच्या संततधारेमुळे मायणी, खटाव, माण, कोरेगाव या भागातील शेतकऱ्यांच्या फळबागा पुर्णपणे उध्दवस्त झाल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.

शासनाची मदतीची शेतकऱ्यांची मागणी

दुष्काळी तालुके म्हणुन राज्यात ओळख असलेल्या या तालुक्यांना पिण्याच्या पाण्यासाठी दरवर्षी प्रशासनाला पाण्याचे टँकर सुरू करावे लागतात, अशी परिस्थीती आहे. या परिस्थितीतही काही शेतकरी द्राक्ष आणि डाळींबाचे मोठ्या प्रमाणात जोपासण्याचे कठीण काम करत आहेत. प्रसंगी या फळबागा जगवण्यासाठी पाणी विकत घेऊन ते या बागांचे संगोपण करतात.

यंदा दुष्काळाचा मोठा फटका या फळबागांना बसला. या बागा जगवण्यासाठी या शेतकर्यांनी दुसऱ्या जिल्ह्यातून टँकरने पाणी विकत आणुन त्यांचे संगोपन केले होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे या बागा पुर्णपणे उद्ध्वस्त झाल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गानेच हिरावुन नेल्याने शेतकरी हवालदिल बनला आहे.

शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी किमान त्यांना भरपाई द्यावी आणि पिक विम्याची रक्कम मिळावी, अशी अपेक्षा या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

Intro:सातारा जिल्ह्यात गत काही दिवसांपासुन सुरु असलेल्या पावसाच्या संततधारेमुळे मायणी, खटाव, माण, कोरेगाव, या भागातील शेतकर्यांच्या फळबागा पुर्णपणे उध्दवस्त झाल्याने या परिसरातील शेतकर्यांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले असुन आजही या शेतकर्यांच्या रानात व फळबागात पाणी साचुन राहिल्याचे चित्र आहे, त्यामुळे जिल्ह्यातील शेतकर्यांच्या डोळ्यात अन रानातही पाणीच पाणी पहावयास मिळत आहे.

Body:दुष्काळी तालुके म्हणुन राज्यात ओळख असलेले हे तालुके पिण्याच्या पाण्यासाठी प्रशासनाला दरवर्षी पाण्याचे टँकर सुरु करावे लागतात अशी येथील परिस्थिती आहे, या परिस्थित ही येथील काही शेतकरी द्राक्ष व डाळींबाचे मोठ्या प्रमाणात जोपासण्याचे कठीण काम करीत आहेत. प्रसंगी या फळबागा जगवण्यासाठी पाणी विकत घेवुन ते या बागांचे संगोपन करीत आहेत. यंदा तर गंभीर पडलेल्या दुष्काळाचा मोठा फटका या फळबागांना बसल्याने या बागा जगवण्यासाठी या शेतकर्यांनी परजिल्ह्यातुन टँकरने पाणी विकत आणुन त्यांचे संगोपन केले आहे, मोठ्या कष्टाने जोपासलेल्या या फळबागा मात्र गत काही दिवसांपासुन सुरु असलेल्या पावसामुळे पुर्णपणे उध्दवस्त झाल्या असुन त्यामुळे शेतकर्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गानेच हिरावुन नेल्याने शेतकरी हवालदिल बनला आहे, कोट्यावधी रुपयांचे नुकसान या पावसामुळे झाले असल्याने शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी किमान त्यांना भरपाई द्यावी व पिक विम्याची रक्कम मिळावी अशी अपेक्षा या नुकसानग्रस्त शेतकर्यांकडुन केली जात आहे.

बाईट
1.शहाजी बाबर द्राक्षे बागायती शेतकरी, सातारा
2.अतुल जाधव माजी सभापती, माण (सातारा)Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.