ETV Bharat / state

Demolition Flyovers In Karad : कराडमधील दोन्ही उड्डाणपूल पाडण्यास सुरुवात, वाहतुकीची होणार कोंडी - उड्डाणपूल पाडून सहापदरीकरणाच्या कामाला सुरुवात

कराडमधील दोन्ही उड्डाणपूल पाडून सहापदरीकरणाच्या कामाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे कराडवासीयांना वाहतूक कोंडीला तोंड द्यावे लागणार आहे. यामुळे महामार्गावरील वाहतूक वळविण्यात आली आहे. उड्डाणपूल पाडण्याचे काम मार्चपर्यत सुरु राहणार असल्याने कराड शहरात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागेल.

Demolition Flyovers In Karad
कराडमधील दोन्ही उड्डाणपूल पाडण्यास सुरुवात
author img

By

Published : Feb 5, 2023, 10:10 PM IST

कराडमधील दोन्ही उड्डाणपूल पाडण्यास सुरुवात

सातारा : शेंद्रे-कागल दरम्यानच्या सहापदरीकरणासाठी कराडच्या कोल्हापूर नाक्यावरील दोन्ही उड्डाणपूल पाडण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे महामार्गावरील वाहतूक वळविण्यात आली आहे. दोन्ही उड्डाणपूल पाडण्याचे काम दि. २५ मार्चपर्यत चालणार आहे. यामुळे पुणे-बंगळुरू महामार्गावर वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार आहे.

दीड वर्ष काम चालणार : महामार्गावर नवीन उड्डाणपूल उभारण्यासाठी दीड वर्षांहून अधिक काळ जाणार आहे. त्यामुळे वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. कोल्हापूर नाका उड्डाणपूल पाडण्यासंदर्भात आणि वाहतुकीबाबत पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार वाहतूक पोलिसांच्या बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे.

ग्रेड सेपरेटरसह होणार उड्डाणपूल : सहापदारीकरणात मलकापूर शहर हद्दीत २९.५ मीटर रुंद व ३.४७० मीटर किमी लांबीचा ११५ पिलरवर आधारित सहापदरी ग्रेडसेपरेटरसह उड्डाणपूल होणार आहे. त्याचबरोबर ५ मीटर रुंदीचे व ३.४७० किमी लांबीचे दोन्ही बाजूला स्लिपरोड होणार आहेत. महामार्गाच्या सहापदरीकरणास गतीने सुरुवात झाली आहे. कोल्हापूर नाक्यावरील जुना उड्डाणपूल पाडण्याच्या कामाला सध्या सुरुवात झाली आहे.

वाहतूकीत बदल : कोल्हापूरकडून येताना द्राविडी प्राणायाम कोल्हापूरकडून सातारा बाजूकडे जाणारी वाहतूक ढेबेवाडी फाट्यावरील ओव्हरब्रिज कराड बाजूस ज्या ठिकाणी संपतो तेथे पश्चिमेकडील सेवारस्त्यावर वळविण्यात येणार आहे. कोल्हापूरहून कराडमध्ये येणारी वाहने ही एकेरी वाहतुकीने वारुंजी फाट्यापर्यंत येतील. तेथून वळसा घालून हॉटेल पंकजसमोरून सेवा रस्त्यामार्गे महात्मा गांधी पुतळ्यासमोरून कराड शहरात जाईल. कराडमधून कोल्हापूरकडे जाणारी वाहने कोल्हापूर नाका येथून सेवा रस्त्याने जातील. कराडमधून साताऱ्याकडे जाणारी वाहने भादी हार्डवेअरसमोरून उजवीकडे यू-र्न घेऊन इंडियन ऑइल पेट्रोलपंपाजवळ सेवा रस्त्याने सातारकडे जातील. सातारकडून कोल्हापूरकडे जाणाऱ्या वाहनांसाठी हॉटेल पंकजसमोरील दुभाजक काढण्यात आला आहे. तेथून वाहने पश्चिम बाजूने पूर्व बाजूच्या सेवा रस्त्याने जातील. हा सेवा रस्ता एकेरी करण्यात आला आहे. कृष्णा हॉस्पिटलसमोरील ब्रिज संपल्यानंतर गंधर्व हॉटेलजवळ वाहने पूर्ववत महामार्गावरून कोल्हापूरकडे जातील.

वाहन पार्किंगला मनाई : सातारकडून कोल्हापूरकडे (वारुंजी फाटा ते गंधर्व हॉटेल) व कोल्हापूरकडून साताराकडे (कोयना वसाहत ते वारुंजी फाटा) जाणारी वाहतूक ही एकेरी असल्याने विरुद्ध दिशेने वाहने चालविण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच या मार्गावर कोणत्याही प्रकारची वाहने पार्किंग करण्यास मनाई करण्यात आली आहे.

हेही वाचा - Naxalites killed BJP leader: नक्षलवाद्यांकडून भाजप नेत्याची निर्घृण हत्या.. घरच्यांसमोर कुऱ्हाडीने केले वार.. छत्तीसगडमध्ये मोठा हल्ला

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.