ETV Bharat / state

महाबळेश्वरचे दीपक कांदळकर यांचा मृतदेह शोधण्यात ६५ तासांनंतर यश - satara district news

महाबळेश्वरच्या माजी नगराध्यक्षा ज्योती कांदळकर यांचे पती, हॉटेल व्यावसायिक दीपक बापूराव कांदळकर यांचा मृतदेह चौथ्या दिवशी सापडला आहे.

दिपक कांदळकर
दिपक कांदळकर
author img

By

Published : Oct 8, 2020, 8:24 PM IST

सातारा - महाबळेश्वरच्या माजी नगराध्यक्षा ज्योती कांदळकर यांचे पती, हॉटेल व्यावसायिक दीपक बापूराव कांदळकर (वय 48) यांचा मृतदेह चौथ्या दिवशी म्हणजेच आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास वेण्णा तलावामधून बाहेर काढण्यात एनडीआरएफचे जवान व महाबळेश्वर ट्रेकर्स पथकाला यश आले.

दीपक कांदळकर हे सोमवार (दि. 5 ऑक्टोबर) सायंकाळपासून बेपत्ता होते. वेण्णा तलाव येथील एका वळणावर त्यांचे चारचाकी वाहन तर वेण्णा तलावावर असलेल्या लोखंडी पुलावर त्यांची चप्पल व मोबाईल मिळून आला होता. वेण्णा तलावमध्ये सोमवारी सायंकाळी आठ वाजल्यापासून महाबळेश्वर ट्रेकर्स पथकाकडून त्यांचा शोध सुरू करण्यात आला होता. पहिल्या दिवशी अपयश आल्याने दुसऱ्या दिवशी कोलाड येथील प्रशिक्षित स्कुबा डायव्हर्सची व महाडची प्रचिती भूतकर या स्कूबा डायवरच्या सहकार्याने तलावामध्ये अद्यावत वॉटरप्रूफ कॅमेराच्या सहाय्याने देखील शोध घेण्याचा प्रयत्न झाला.

पुन्हा तिसऱ्या दिवशी, बुधवारी सकाळी सात वाजता महाबळेश्वर ट्रेकर्स जवानांकडून शोधकार्य सुरू झाले. सकाळी अकरा वाजता पुणे येथील एनडीआरएफचे कमांडर राजेश यावले यांच्यासह 20 जणांचे पथक वेण्णा तलाव येथे दाखल झाले होते. पाच प्रशिक्षित डायव्हर्स चार मशीन बोटच्या सहायाने वेण्णालेक परिसराची पाहणी करण्यात आली. सात प्रशिक्षित डायव्हर्सनी तीस ते चाळीस फुट खोल तळापर्यंत जाऊन शोध घेतला. मात्र यश आले नाही.

आज चौथ्या दिवशी सकाळी एनडीआरएफ जवान व महाबळेश्वर ट्रेकर्स पथकाने नगरपालिका कर्मचारी पथकांच्या सहकार्याने शोधकार्य सुरू केले. दुपारी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास वेण्णा तलावात एनडीआरएफचे जवान डिपड्राइव्हर सुधीर यांना लोखंडी पुलापासून सुमारे पन्नास फूट अंतरावर त्यांचा मृतदेह गाळात रुतलेला आढळला. त्यांनी ही खबर एनडीआरएफच्या पार्टी कमांडर राजेश यावले यांना दिली. त्यांनी तातडीने इतर डायव्हर्स एकत्र करून दीपक कांदळकर यांचा मृतदेह दुपारी बारा वाजता बाहेर काढण्यात यश आले.

यावेळी तहसिलदार सुषमा पाटील यांच्यासह पालिकेचे पदाधिकारी, महाबळेश्वरचे नागरिक उपस्थित होते. त्यांचा मृतदेह पाहून जवळचे मित्रमंडळी, नातेवाईक यांच्या अश्रूंचा बांध फुटला. गेली तीन दिवस सुरू असलेले हे शोधकार्य आज चौथ्या दिवशी थांबले. दीपक कांदळकर हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, आई व वडील असा परिवार आहे.

हेही वाचा - पाटणमधील मल्हारपेठ दूरक्षेत्राला स्वतंत्र पोलीस स्टेशनची मान्यता

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.