सातारा - दहिवडी येथे परतीच्या पावसामुळे साचलेल्या पाण्यात २ वर्षाच्या मुलीचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आराध्या पांडुरंग काटकर असे मृत्यू झालेल्या चिमुकलीचे नाव आहे. दरम्यान, या घटनेने माण तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
याबद्दल अधिक माहिती अशी की, पांडुरंग काटकर आपल्या कुटुंबासह दहिवडी कॉलेजच्या परिसरात राहतात. परतीच्या पावसामुळे दहिवडी कॉलेजच्या पाठीमागे असणाऱ्या वसाहतीमध्ये पावसाने पाणी साचले होते. या ठिकठिकाणी खड्डे असून त्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. आराध्या खेळण्यासाठी बाहेर गेली असता, ती त्या पाण्याने भरलेल्या खड्यात पडली आणि त्यात तिचा बुडून मृत्यू झाला.