सातारा - जिल्ह्यात कोरोना रुग्णांची घटती संख्या पाहता जिल्हाधिकाऱ्यांनी संचारबंदीमध्ये काहीशी शिथिलता दिली आहे. याशिवाय अत्यावश्यक सेवेतील किराणा, भाजी, मास-मच्छी, बेकरी यांना काही प्रमाणात मुभा राहील. 50 टक्के क्षमतेने बस वाहतूकही सुरू होणार आहे. आज (६ जून) मध्यरात्रीपासून नवे निर्बंध व सवलती लागू होतील. शनिवार-रविवार मात्र, संचारबंदीसह सर्व निर्बंध कायम असतील.
लग्नसमारंभाला दोन तासांसाठी पंचवीस लोकांच्या मर्यादित तहसीलदारांची परवानगी
20 नातेवाईकांच्या उपस्थितीत अंत्यविधी/ दशक्रिया विधी करता येईल
राहण्याची व्यवस्था बांधकामाच्या ठिकाणी असेल अशी बांधकामे
केस कर्तनालय, सौंदर्य केंद्रे येथे फक्त लस घेतलेल्या ग्राहकांसाठी दुपारी दोन वाजेपर्यंत परवानगी
सार्वजनिक व परिवहन बसेस 50% क्षमतेने धावतील. खाजगी वाहने, टॅक्सी, बसेस, लांब पल्ल्याच्या रेल्वे प्रवाशांचा आंतरजिल्हा प्रवास नियमित
जिल्ह्यातील सर्व बाजार समित्या सकाळी सात ते दुपारी दोन वाजेपर्यंत सुरू राहतील. बाजार समित्यांच्या ठिकाणी फक्त घाऊक किंवा किरकोळ विक्रेत्यांना तेथे जाऊन माल घेता येईल
हे राहणार बंद
अत्यावश्यक नसलेली दुकाने, मॉल, सिनेमागृहे, नाट्यगृहे.
हॉटेल, रेस्टॉरंट ही केवळ पार्सल घरपोचसाठी चालू. याठिकाणी बसण्यास परवानगी नाही.
लॉजिंग सुविधा पूर्णपणे बंद
शासकीय कार्यालय व ज्या खाजगी कार्यालयांना परवानगी देण्यात आली आहे अशांना 25% क्षमतेने चालू ठेवण्यास परवानगी
सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक प्रार्थनास्थळे, करमणूक कार्यक्रम, मेळावे, क्रीडा स्पर्धा, व्यायाम शाळा बंद.