कराड (सातारा) - सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी कराडच्या वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा पहिला डोस घेतला. ही लस पुर्णत: सुरक्षित असून लसीबाबत कोणतीही शंका न बाळगता सर्वांनी लस घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
खबरदारी घेण्याचे आवाहन
लसीकरणासाठी वेणूताई चव्हाण उपजिल्हा रूग्णालयात आवश्यक त्या सर्व सोयी-सुविधा उपलब्ध केल्या आहेत. लोकांनी पूर्ण विश्वासाने ही लस टोचून घ्यावी. 60 वर्षांवरील सर्व व्यक्तींनी प्राधान्याने ही लस घ्यावी. कोरोनाचे संक्रमण पुन्हा वाढू लागले आहे. त्याला प्रतिबंध करण्यासाठी लस उपलब्ध झाली आहे. लसीचा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रात राबविला जात आहे. लस उपलब्ध असली तरी कोरोनाबाबत सर्वांनी मास्क, सॅनिटायझर आणि सामाजिक अंतर पाळून खबरदारी घेण्याचे आवाहन पाटील यांनी केले. यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी संगीता देशमुख, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक प्रकाश शिंदे, डॉ. खैरमोडे, डॉ. धर्माधिकारी, डॉ. रमेश लोखंडे उपस्थित होते.
हेही वााचा- कोरोनाची आणखी नवी रुपं येणार समोर; एनटीडीसीच्या संचालकांनी व्यक्त केली भीती