ETV Bharat / state

दोन वर्षाच्या मुलासह आईची कोरोनावर मात; कृष्णा रुग्णालयामधून ८ जणांना डिस्चार्ज - सातारा कोरोना लेटेस्ट न्यूज

दोन वर्षाच्या मुलासह आईने कोरोनावर मात केली असून कोरोनामुक्त रुग्णांना शनिवारी डिस्चार्ज देण्यात आला. आत्तापर्यंत कृष्णा रुग्णालयामधून एकूण 185 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

सातारा
सातारा
author img

By

Published : Jun 13, 2020, 5:21 PM IST

सातारा - कृष्णा रुग्णालयाच्या कोरोना वॉर्डमध्ये उपचार सुरू असलेले 8 जण कोरोनामुक्त झाले. दोन वर्षांच्या मुलासह आईने कोरोनावर मात केली असून कोरोनामुक्त रुग्णांना शनिवारी डिस्चार्ज देण्यात आला. आत्तापर्यंत कृष्णा रुग्णालयामधून एकूण 185 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

पाटण तालुक्यातील जांबेकरवाडी येथील 22 वर्षीय महिला व तिचा 2 वर्षांचा मुलगा, बहुलेकरवाडी येथील 60 वर्षीय पुरूष, कालेवाडी येथील 46 वर्षीय पुरूष, मारूल-दिवशी येथील 27 वर्षीय युवक, सळवे येथील 45 वर्षीय महिला आणि कराड तालुक्यातील खराडे-हेळगाव येथील 55 वर्षीय पुरूष, 45 वर्षीय महिला या आठ रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने आज त्यांना टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज देण्यात आला.

यावेळी आकाश चौगले, डॉ. नसिमा कणसे, डॉ. हर्षाली पाटील, डॉ. शालू शर्मा, कृष्णा रुग्णालयाचे कर्मचारी शंकर पाटील, मुसा मुल्लाणी, दीपक कदम, पोपट जाधव, गणेश पाटोळे, जयंत शिंदे, अमोल कांबळे व बबन कदम यांच्या हस्ते कोरोनामुक्त रुग्णांचा पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी कृष्णा रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. ए. वाय. क्षीरसागर, डॉ. संजय पाटील, डॉ. विनायक राजे, रोहिणी बाबर यांच्यासह रुग्णालयातील स्टाफ उपस्थित होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.