ETV Bharat / state

कोरोनाला कंटाळून पाचवडच्या वृद्धाची वाईत आत्महत्या, कृष्णा नदीत मारली उडी - सातारा कोरोना आकडेवारी बातमी

कोरोनाला कंटाळून रुग्णालयातील डॉक्टर व परिचारिकांना मारहाण करत एका रुग्णाने कृष्णा नदीपात्रात उडी घेत आत्महत्या केली.

wai
घटनास्थळ
author img

By

Published : Sep 6, 2020, 9:28 PM IST

सातारा (वाई) - वाईतील कोविड रुग्णालयात उपचार सुरू असणाऱ्या रुग्णाने आजाराला कंटाळून, नैराश्यातून रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करत मारहाण केली. त्यानंतर रुग्णालयातून पळून जाऊन कृष्णा नदी पात्रात उडी मारून आत्महत्या केली. संचित कोविडं रुग्णालयाजवळ आज (दि. 6 सप्टें) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

पाचवड (ता. वाई) येथील 65 वर्षांच्या एका वृद्धाची कोरोना चाचणी चार दिवसांपूर्वी पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर त्यांना उपचारासाठी वाईतील कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या प्रकृतीत चांगली सुधारणा झाली होती. मात्र, शनिवारी (दि. 7 सप्टें) त्यांनी मुलाल फोन करून प्रकृती उत्तम असल्याचे सांगत घरी नेण्यास सांगितले होते. मात्र, त्यांना कोरोनामुळे नैराश्य आले होते. त्यामुळे त्यांनी आत्महत्येचा विचारही बोलून दाखवला होता.

पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास ऑक्सिजन मास्क काढून फेकत त्यांनी परिचारिका व डॉक्टरांना धक्काबुक्की केली. त्यानंतर रुग्णालयातून पळ काढला. मात्र, पीपीई कीट नसल्याने त्यांच्या मागे कोणीही धावले नाही. पण, याबाबत डॉ.विद्याधर घोटवडेकर यांना माहिती दिल्यानंतर ताबडतोब डॉक्टरांनी रात्रगस्तीवरील पोलिसांच्या मदतीने त्यांना पकडून रुग्णालयात आणले. त्यांची समजूत काढत त्यांना विश्रांती करण्याचा सल्ला दिला. याबाबत त्यांच्या नातेवाईकांना कल्पना देण्यात आली.

पुढील उपचारात त्यांना खाटेला बँडेज पट्टीच्या साहाय्याने बांधून ठेवण्यात आले होते. आपल्याला कोरोना झाला आहे, याचे त्यांना वाईट वाटत होते. त्यांनी घरी सोडण्याची मागणी केली. मात्र, उपचार पूर्ण होईपर्यंत त्यांना घरी सोडणे शक्य नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दोन-तीन दिवसांनी त्यांना घरी सोडण्यात येणार होते. दरम्यान, दुपारी त्यांनी पुन्हा ऑक्सिजन यंत्रणा काढून टाकली. त्यावेळी रुग्णालयातील डॉक्टरांनी व सेविकांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांनी स्वतःच्या ताकदीने बँडेज पट्ट्या तोडून व सेविकेला धक्काबुक्की व मारहाण करत संरक्षक दरवाजा तोडून रुग्णालयातून पळ काढला. त्यानंतर त्यांनी लगतच्या कृष्णा नदी पात्रात उडी मारली. डॉ. घोटवडेकर व सहकारी कर्मचाऱ्यांनी नदी पात्रातून बाहेर काढून रुग्णालयातील कोविड रुग्णालयातील अतिदक्षता विभागात आणले. पण, त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेची नोंद वाई पोलीस ठाण्यात झाली आहे.

हेही वाचा - 'व्हेंटिलेटर' अभावी रुग्णालयासमोरच कोरोनाग्रस्ताने सोडला जीव; मृतदेह तीन तास रिक्षातच

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.