सातारा - छत्रपती घराण्याचे कुलदैवत, छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या खासगी मालकीचे देवस्थान शिखर शिंगणापूर या ठिकाणी हजारो भक्त दर्शनासाठी येत असतात. मात्र, आज या ठिकाणी पूर्ण शुकशुकाट पहायला मिळत आहे. तसेच जिल्ह्यातील प्रसिद्ध असणाऱ्या ब्राह्मचैतन्य महाराज समाधी मंदिराच्या गाभाऱ्यातील दर्शन बंद करून मुखदर्शन दिले जात आहे. कोरोना विषाणूमुळे भाविक घराबाहेर पडत नाहीत.
भाविकांना मंदिरात राहण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. या ठिकाणी देशभरातून लाखों भाविक येत जात असतात. त्यांची राहण्याची सोयदेखील मंदिर प्रशासन करत असते, ते आज बंद करण्यात आले आहे. भाविकांची संख्या कमी झाल्याने मंदिर परिसरातील दुकानांमध्येही ग्राहक खूप कमी झाले आहेत. नेहमी गजबजलेल्या मंदिर व परिसरात सध्या भाविकांअभावी शुकशुकाट आहे.
हेही वाचा -