ETV Bharat / state

कराडामध्ये सहकारमंत्री बाळासाहेब पाटलांची भव्य मिरवणूक

सहकार आणि पणन मंत्रिपद मिळालेल्या कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील यांची रविवारी (दि. 5 जाने.) कराडमध्ये जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली. यावेळी त्यांची पेढ्यांची तुला करण्यात आली.

मिरवणुकीचे छायाचित्र
मिरवणुकीचे छायाचित्र
author img

By

Published : Jan 6, 2020, 7:46 AM IST

Updated : Jan 6, 2020, 9:53 AM IST

सातारा - सहकार आणि पणन मंत्रिपद मिळालेल्या कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील यांची रविवारी (दि. 5 जाने.) कराडमध्ये जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली. दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीसह कराडमधील महापुरूषांच्या पुतळ्यांना बाळासाहेब पाटील यांनी अभिवादन केले. रॅलीवेळी कराडकरांनी पुष्पवृष्टी करून मंत्री पाटील यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला. कार्यकर्त्यांनी त्यांची पेढ्यांची तुला केली. त्यानंतर नागरीकांना पेढे वाटण्यात आले.

कराडात सहकारमंत्री बाळासाहेब पाटलांची भव्य मिरवणूक

विलासकाका उंडाळकर यांच्यानंतर बाळासाहेब पाटील यांच्या रूपाने कराड तालुक्याला दुसऱ्यांदा सहकार आणि पणन खात्याचे मंत्रिपद मिळाले आहे. बाळासाहेबांना सहकार मंत्रिपद जाहीर झाल्यानंतर त्यांना शुभेच्छा देण्यासाठी रविवारी सकाळपासून त्यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांची रिघ लागली होती. दुपारी बाळासाहेब पाटील यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराजांसह शहरातील महापुरूषांच्या पुतळ्यांना अभिवादन केले. दत्त चौकात कार्यकर्त्यांनी त्यांची पेढे तुला केली.

हलगी आणि घुमक्याच्या कडकडाटात दत्त चौकातून मिरवणुकीस प्रारंभ झाला. रॅलीतील जीपमध्ये मंत्री बाळासाहेब पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, राष्ट्रवादीच्या माहिती तंत्रज्ञान सेलचे प्रदेशाध्यक्ष सारंग पाटील, जिल्हा परिषद सदस्य मानसिंगराव जगदाळे, इंद्रजीत चव्हाण, नगरसेवक सौरभ पाटील, कराड पंचायत समितीचे सभापती प्रणव ताटे, संभाजी सुर्वे, जशराज पाटील होते. दत्त चौकातून मिरवणूक सुरू झाली. कराडच्या मुख्य बाजारपेठेतून मिरवणूक प्रीतिसंगमाकडे गेली. यावेळी व्यापारी, सार्वजनिक गणेश मंडळे, विविध संस्थांच्या पदाधिकार्‍यांनी मंत्री पाटील यांचे स्वागत केले. चौकांमध्ये रॅलीवर पुष्पवृष्टी करण्यात आली. मिरवणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

हेही वाचा - मिरजेत खून करून पळालेले दोघे कराड पोलिसांच्या ताब्यात

प्रीतिसंगमावरील दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीला मंत्री पाटील यांच्यासह मान्यवरांनी अभिवादन केले. त्यानंतर मंगळवार पेठेतील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून रॅली दिवंगत पी. डी. पाटील यांच्या निवासस्थानी गेली. तेथे मिरवणुकीचा समारोप झाला. कराड पंचायत समितीमध्ये माजी सहकार मंत्री उंडाळकर आणि विद्यमान सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या गटाचा राजकीय पैरा आहे.

हेही वाचा - पुण्यातील व्यवसायिकाचे २ कोटीसाठी अपहरण करून साताऱ्यात गोळी घालून हत्या

Intro:सहकार आणि पणन मंत्रीपद मिळालेल्या कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील यांची रविवारी कराडमध्ये जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली. स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीसह कराडमधील महापुरूषांच्या पुतळ्यांना ना. पाटील यांनी अभिवादन केले. रॅलीवेळी कराडकरांनी पुष्पवृष्टी करून ना. पाटील यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला. कार्यकर्त्यांनी त्यांची पेढे तुला करून नागरीकांना पेढे वाटण्यात आले.Body:
कराड (सातारा) - सहकार आणि पणन मंत्रीपद मिळालेल्या कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील यांची रविवारी कराडमध्ये जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली. स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीसह कराडमधील महापुरूषांच्या पुतळ्यांना ना. पाटील यांनी अभिवादन केले. रॅलीवेळी कराडकरांनी पुष्पवृष्टी करून ना. पाटील यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला. कार्यकर्त्यांनी त्यांची पेढे तुला करून नागरीकांना पेढे वाटण्यात आले.
विलासकाका उंडाळकर यांच्यानंतर आ. बाळासाहेब पाटील यांच्या रूपाने कराड तालुक्याला दुसऱ्यांदा सहकार आणि पणन खात्याचे मंत्रीपद मिळाले आहे. बाळासाहेबांना सहकार मंत्रीपद जाहीर झाल्यानंतर त्यांना शुभेच्छा देण्यासाठी रविवारी सकाळपासून त्यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांची रिघ लागली होती. दुपारी बाळासाहेब पाटील यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छ. शिवाजी महाराजांसह शहरातील महापुरूषांच्या पुतळ्यांना अभिवादन केले. दत्त चौकात कार्यकर्त्यांनी त्यांची पेढे तुला केली.
हलगी आणि घुमक्याच्या कडकडाटात दत्त चौकातून मिरवणुकीस प्रारंभ झाला. रॅलीतील जीपमध्ये ना. बाळासाहेब पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, राष्ट्रवादीच्या माहिती तंत्रज्ञान सेलचे प्रदेशाध्यक्ष सारंग पाटील, जिल्हा परिषद सदस्य मानसिंगराव जगदाळे, इंद्रजीत चव्हाण, नगरसेवक सौरभ पाटील, कराड पंचायत समितीचे सभापती प्रणव ताटे, संभाजी सुर्वे जशराज पाटील होते. दत्त चौकातून मिरवणूक सुरू झाली. कराडच्या मुख्य बाजारपेठेतून मिरवणूक प्रीतिसंगमाकडे गेली. यावेळी व्यापारी, सार्वजनिक गणेश मंडळे, विविध संस्थांच्या पदाधिकार्‍यांनी ना. पाटील यांचे स्वागत केले. चौकांमध्ये रॅलीवर पुष्पवृष्टी करण्यात आली. मिरवणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
प्रीतिसंगावरील स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीला ना. पाटील यांच्यासह मान्यवरांनी अभिवादन केले. त्यानंतर मंगळवार पेठेतील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून रॅली स्व. पी. डी. पाटील यांच्या निवासस्थानी गेली. तेथे मिरवणुकीचा समारोप झाला.Conclusion:ना. बाळासाहेब पाटील यांची पेढे तुला करण्यासाठी त्यांचे कट्टर कार्यकर्ते रणजीत पाटील यांनी कोयना सहकारी दूध संघाचे प्रसिद्ध कोयना पेढे आणले होते. कराड पंचायत समितीमध्ये माजी सहकार मंत्री उंडाळकर आणि विद्यमान सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या गटाचा राजकीय पैरा आहे. बाळासाहेबांची तुला विलासकाका उंडाळकरांच्या नेतृत्वाखालील कोयना दूध संघाच्या पेढ्यांनी करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात त्याची जोरदार चर्चा झाली.
Last Updated : Jan 6, 2020, 9:53 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.