ETV Bharat / state

यशवंतराव चव्हाणांना काँग्रेस न्याय देऊ शकली नाही; अमित शाहांचा आरोप - Maharashtra Assembly Elections 2019

काँग्रेसने साताऱ्यातील नेत्यांचा कधीच सन्मान केला नाही. यशवंतराव चव्हाणांसारख्या नेतृत्वालाही काँग्रेस न्याय देऊ शकली नाही, असा आरोप भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केला.

कराड येथील सभेत बोलताना अमित शाह
author img

By

Published : Oct 14, 2019, 2:11 AM IST

सातारा - काँग्रेसची भूमी म्हणून सातारा मला माहित आहे. मात्र, काँग्रेसने येथील नेत्यांचा कधीच सन्मान केला नाही. यशवंतराव चव्हाणांसारख्या नेतृत्वालाही काँग्रेस न्याय देऊ शकली नाही, असा आरोप भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केला. कराड दक्षिणमधील भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार डॉ. अतुल भोसले यांच्या प्रचार सभेत शाह बोलत होते.

यशवंतराव चव्हाणांसारख्या नेतृत्वालाही काँग्रेस न्याय देऊ शकली नाही

देशात काँग्रेसची सत्ता असताना केंद्र सरकारकडून महाराष्ट्र सरकारला निधी मिळत असे. या निधीमध्ये देखील काँग्रेसकडून भ्रष्टाचार होत असे. शहीदांच्या पत्नींसाठी बांधण्यात आलेल्या आदर्श सोसायटीतील फ्लॅटसुध्दा काँग्रेसच्या नेत्यांनी विकले, अशी टीका शाहांनी केली.

हेही वाचा - 'महाराष्ट्राच्या इतिहासात देवेंद्र फडणवीसांचे नाव काळ्या अक्षरात लिहले जाईल'

सध्या केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर शरद पवार भ्रष्टाचाराचा एकही आरोप करू शकले नाहीत. भारतीय जनता पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. छोटे-छोटे कार्यकर्ते राष्ट्रवादी विचारधारा घेऊन पार्टीला पुढे नेत आहेत.

Intro:सातारा जिल्हा हा काँग्रेसची भूमी आहे. परंतु, काँग्रेसने नेत्यांचा कधीच सन्मान केला नाही. यशवंतराव चव्हाण यांच्यासारख्या नेतृत्वालाही काँग्रेस न्याय देऊ शकली नाही, असा आरोप भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कराड दक्षिणमधील भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार डॉ. अतुल भोसले यांच्या जाहीर प्रचार सभेत केला. Body:कराड (सातारा) : सातारा जिल्हा हा काँग्रेसची भूमी आहे. परंतु, काँग्रेसने नेत्यांचा कधीच सन्मान केला नाही. यशवंतराव चव्हाण यांच्यासारख्या नेतृत्वालाही काँग्रेस न्याय देऊ शकली नाही, असा आरोप भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कराड दक्षिणमधील भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार डॉ. अतुल भोसले यांच्या जाहीर प्रचार सभेत केला. 
   देशात काँग्रेसची सत्ता असताना केंद्र सरकारकडून महाराष्ट्र सरकारला जे पॅकेज दिले जायचे. त्यात सुध्दा काँग्रेसकडून भ्रष्टाचार व्हायचा. इतकेच नाही, तर शहीदांच्या पत्नींसाठी बांधण्यात आलेल्या आदर्श सोसायटीतील फ्लॅटसुध्दा काँग्रेसवाल्यांनी विकल्याचा हल्लाबोल करून शहा म्हणाले, केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार आहे. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर शरद पवार भ्रष्टाचाराचा एकही आरोप करू शकले नाहीत. 
  भारतीय जनता पार्टी ही कार्यकर्त्यांची पार्टी आहे. नेत्यांची पार्टी नाही. छोटे-छोटे कार्यकर्ते राष्ट्रवादी विचारधारा घेऊन पार्टीला पुढे नेत आहेत. मोदी असोत अथवा आणखी कोणी असो. पोस्टर लावत-लावत आणि घोषणा देत-देत ते नेता झाले आहेत, असे शहा म्हणाले.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.