ETV Bharat / state

'कोरोनामुळे सहकारी संस्थाच्या निवडणुका आणखी तीन महिने लांबणीवर' - minister balasaheb patil

कोरोनाच्या गंभीर परिस्थितीचा विचार करून सरकारने काही अटी लावून लॅाकडाऊनचा कालावधी 30 जूनपर्यंत वाढविला आहे. तसेच साथीचा रोग आटोक्यात येण्यास काही अवधी लागणार आहे. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका घेणे उचित होणार नाही, असे पाटील म्हणाले.

balasaheb patil
बाळासाहेब पाटील
author img

By

Published : Jun 18, 2020, 2:28 PM IST

कराड (सातारा) - राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन सहकारी संस्थाच्या निवडणुका आणखी तीन महिने पुढे ढकलण्यात आल्या असल्याचे सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी जाहीर केले. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी राज्यातील सर्व सहकारी संस्थाच्या निवडणुका 18 मार्चच्या शासन निर्णयानुसार तीन महिन्यासाठी पुढे ढकलण्यात आल्या होत्या. आज पुन्हा पाटील यांनी सध्या तरी निवडणुका घेणे शक्य नसल्याचे सांगितले आहे.

कोरोनाच्या गंभीर परिस्थितीचा विचार करून सरकारने काही अटी लावून लॅाकडाऊनचा कालावधी 30 जूनपर्यंत वाढविला आहे. तसेच साथीचा रोग आटोक्यात येण्यास काही अवधी लागणार आहे. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका घेणे उचित होणार नाही, असे पाटील म्हणाले.

सरकारने कोरोनाची सद्यस्थिती लक्षात घेऊन महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 73 क मधील तरतुदीनुसार ज्या प्रकरणी उच्च/सर्वोच्च न्यायालयाने निवडणुका घेण्याचे आदेशीत केले आहे. अशा सहकारी संस्था वगळून राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका आदेशाच्या दिनांकापासून ज्या टप्यावर असतील त्या टप्प्यावर पुन्हा पुढील तीन महिन्यांपर्यत पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला असल्याचे सहकार मंत्री पाटील यांनी संगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.