ETV Bharat / state

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याला खराब हवामानाचा फटका, हेलिकॉप्टर पुणे विमानतळाकडे रवाना

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी कऱण्याकरिता पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते. मात्र पुणे विमानतळावरून साताऱ्याकडे उड्डाण केल्यानंतर हवामान खराब असल्याने ते पुन्हा माघारी परतले आहेत. कोयना परिसरातील हवामान सध्या खराब आहे. त्यामुळे ते सध्या पुण्यात थांबले आहेत.

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याला खराब हवामानाचा फटका,

author img

By

Published : Jul 26, 2021, 1:10 PM IST

कराड (सातारा) - मुख्यमंत्री उध्दव ठाकरे पाटण तालुका दौर्‍यावर येण्यासाठी मुंबईहून सातार्‍यात आले. परंतु, खराब हवामानामुळे मुख्यमंत्र्यांना पुण्याला परत जावे लागले आहे. पाटण तालुक्यातील आंबेघर आणि मिरगाव येथे झालेल्या भूस्खलानाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री आज पाटण तालुका दौर्‍यावर येणार होते. कोयनानगर येथील हेलिपॅडवर मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर लँड होणार होते. परंतु, खराब हवामानामुळे मुख्यमंत्र्यांना पुण्याला जावे लागले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी कऱण्याकरिता पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते. मात्र पुणे विमानतळावरून साताऱ्याकडे उड्डाण केल्यानंतर हवामान खराब असल्याने त्यांना पुन्हा माघारी परतावे लागले आहे. कोयना परिसरातील हवामान सध्या खराब आहे. त्यामुळे ते सध्या पुण्यात थांबले आहेत.

मुख्यमंत्र्यांच्या दौर्‍यामुळे कोयनानगरमध्ये सातारा जिल्हा प्रशासन तळ ठोकून आहे. परंतु, कोयनानगर, नवजा येथे पावसाची संततधार सुरू आहे. या खराब हवामानामुळे मुख्यमंत्र्यांना सातार्‍यातून माघारी फिरावे लागले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील खराब हवामानामुळे कोल्हापूरचा दौरा रद्द केला आहे. ते सांगलीतील पूरस्थितीचा आढावा घेऊन सायंकाळी सातार्‍यात येणार आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.