ETV Bharat / state

CM helicopter break down : मुख्यमंत्र्यांचे साताऱ्यात इमर्जन्सी लँडिंग, महाबळेश्वर दौरा सोडून विश्रामगृहावर रवाना - CM helicopter break down

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महाबळेश्वर दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री हे दरे या गावी निघाले असताना महाबळेश्वरमधील खराब हवामानाचा त्यांना फटका बसला. त्यामुळे त्यांच्या हेलिकॉप्टरला साताऱ्यातील सैनिक स्कूलच्या हेलिपॅडवर उतरावे लागले.

CM Eknath Shinde
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
author img

By

Published : Aug 10, 2023, 6:10 PM IST

Updated : Aug 10, 2023, 6:34 PM IST

सातारा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महाबळेश्वर दौऱ्यावर आहेत. दुपारी महाबळेश्वर परिसरात हवामान खराब असल्याने त्यांचे हेलिकॉप्टर साताऱ्यातील सैनिक स्कूलच्या हेलिपॅडवर उतरले. दोन दिवस ते दरे गावी मुक्कामी जाणार आहेत. मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर अचानक साताऱ्यात लॅंडींग करणार असल्याचा मेसेज मिळताच प्रशासकीय अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली. सैनिक स्कूलच्या हेलिपॅडवर हेलिकॉप्टरचे लँडिंग झाल्यानंतर पालकमंत्री शंभूराज देसाई, पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. त्यानंतर मुख्यमंत्री साताऱ्यातील शासकीय विश्रामगृहात दाखल झाले.

या आधीही शिंदे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड : या आधीही अशीच घटना घडली होती. सत्तासंघर्षावरील निकालानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 13 मे रोजी सातारा दौऱ्यावर होते. जिल्ह्यातील मरळी (ता. पाटण) येथे 'शासन आपल्या दारी’ या राज्यस्तरीय अभियानाचा शुभारंभ मुख्यमंत्री यांच्या हस्ते पार पडणार होता. परंतु मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये सुरुवातीला बिघाड होऊन त्यांचे हेलिकॉप्टर राजभवन परिसरातच भरकटले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा दौरा अचानक रद्द करण्यात आला होता. मात्र पुन्हा हेलिकॉप्टरची पाहणी करण्यात आली होती. त्याची किरकोळ दुरुस्ती करुन पुन्हा मुख्यमंत्री कराडकडे रवाना झाले होते.

सातारा जिल्ह्यावर चांगलेच लक्ष : शासकीय योजनेच्या उद्घाटनाच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांकडून आगामी निवडणुकीची साखर पेरणी होईल अशी चर्चा आहे. मुख्यमंत्री यापूर्वीही नेहमीच सातारा दौऱ्यावर आले आहेत. सातारा जिल्ह्यातच त्यांचे गाव असल्याने त्यांचे सातारा जिल्ह्यावर चांगलेच लक्ष असते. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील अनेक कामे त्यांनी स्वतः मार्गी लावल्याचे दिसून येत आहे.

शेतामध्ये हेलिकॅप्टर इमर्जन्सी लँड : पुण्यावरून हैद्राबादला निघालेले भारतीय वायुदलाचे हेलिकॉप्टर अचानकपणे तांत्रिक बिघाड झाल्याने खांडज गावातील शेतात उतरवले ( Air Force Helicopter Emergency Landing Khandaj ) होते. हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आली होती. ( Technical Glitch In Helicopter ) खांडज गावाच्या शिवारात हनुमंत ज्ञानदेव आटोळे यांच्या शेतामध्ये इंडियन एअर फोर्सचे चेतक हेलिकॅप्टर इमर्जन्सी लँड करण्यात आली होती तसेच कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.

हेही वाचा -

  1. CM helicopter break down : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, सातारा दौरा आधी रद्द, दुरुस्तीनंतर मुख्यमंत्री कराडकडे रवाना
  2. Deoghar Ropeway Accident Video: देवघर येथे रेस्क्यू करताना हेलिकॉप्टरमध्ये बसताना खाली पडून एकाचा मृत्यू
  3. तांत्रिक बिघाड! गाझियाबादमध्ये चक्क रस्त्यावर उतरवले विमान..

Last Updated : Aug 10, 2023, 6:34 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.